PMC Water Supply Scheme | लोहगांव आणि वाघोली गावाच्या समान पाणीपुरवठा योजनेसाठी 173 कोटींचा खर्च!
PMC Water Supply Scheme | पुणे | महापालिका (PMC Pune) हद्दीत 2017 साली समाविष्ट झालेल्या लोहगांव (Lohgaon) आणि वाघोली (Wagholi) या गावांत समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी 173 कोटींचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
राज्य सरकारच्या वतीने 2017 साली महापालिका हद्दीत 11 गावे समाविष्ट केली होती. यामध्ये लोहगाव आणि वाघोली या गावांचा समावेश होता. पुणे शहरा प्रमाणे या गावांत देखील समान पाणीपुरवठा योजना राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार या योजने अंतर्गत वाघोली आणि लोहगांव या गावांत पाण्याच्या लाईन विकसित करायच्या आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती. हे काम अरिहंत कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. त्यानुसार या कामासाठी 173 कोटी इतका खर्च येणार आहे. त्यानुसार मंजूरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.