Rajiv Gandhi Zoological Park | Katraj Zoo | पुणे महापालिकेकडून  लहानग्यांना ‘ख्रिसमस गिफ्ट’ | उद्यापासून पुढील 8 दिवस कात्रज झू मोफत पाहण्याची संधी! 

HomeBreaking Newsपुणे

Rajiv Gandhi Zoological Park | Katraj Zoo | पुणे महापालिकेकडून  लहानग्यांना ‘ख्रिसमस गिफ्ट’ | उद्यापासून पुढील 8 दिवस कात्रज झू मोफत पाहण्याची संधी! 

कारभारी वृत्तसेवा Dec 22, 2023 12:54 PM

Now there is no need to stand in queue for tickets in Katraj Zoo | Book tickets online from home
Katraj Zoo Online Ticket | आता कात्रज झू मध्ये तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही | घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट
Rajeev Gandhi Zoo : एका दिवसात तब्बल १२ हजार पर्यटकांची प्राणिसंग्रहालयाला भेट

Rajiv Gandhi Zoological Park | Katraj Zoo | पुणे महापालिकेकडून  लहानग्यांना ‘ख्रिसमस गिफ्ट’ | उद्यापासून पुढील 8 दिवस कात्रज झू मोफत पाहण्याची संधी!

Rajiv Gandhi Zoological Park | Katraj Zoo | नाताळ (Christmas) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहान मुलांसाठी हा सण खास आकर्षण असतो. काही शाळा आठवडाभर सुट्टी घोषित करतात. त्यामुळे पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) देखील या लहान मुलांना ‘ख्रिसमस गिफ्ट’ दिले आहे. उद्यापासून पुढील 8 दिवस 8 वर्षाखालील मुलांना राजीव गांधी प्राणिसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological park and Wildlife Research Centre) मोफत पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेचे उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade) यांनी केले आहे.

पुणे महानगरपालिका, उद्यान विभागाकडून (PMC Pune Garden Department) विकसित करण्यात आलेले स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र (Rajiv Gandhi Snake Park) हे भारतातील अग्रगण्य प्राणीसंग्रहालय आहे. यामध्ये सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यकांमध्ये प्रौंढ नागरिक, लहान मुले, शालेय विद्यार्थी तसेच विदेशी पर्यटकांना प्रवेश देणेसाठी तिकीट आकारणी करणेत येत असते. (Pune Municipal Corporation)

नाताळ सणाचे औचित्य साधून २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ८ वर्षा खालील लहान मुलांना (उंची ४ फुट ४ इंचा पर्यंत) नि;शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. तरी लहान मुलांना राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र नि: शुल्क पाहण्याकरिता नोंदणी PMC CARE अॅप व संकेतस्थळावरून ऑनलाईन केल्यानंतर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तरी या संधीचा फायदा सर्व लहान मुलांनी घ्यावा. असे आवहान पुणे महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.