PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नती साठीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

HomeपुणेBreaking News

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नती साठीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

कारभारी वृत्तसेवा Dec 19, 2023 5:21 AM

Pune Entrepreneurs | PPP | आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी पुण्यातील उद्योजकांची पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा!
River Revival Project | जुन्या व दुर्मिळ वृक्षांबाबत पुणे महापालिकेला करावा लागला खुलासा | नेमके काय आहे प्रकरण?
Home Minister Amit Shah | देवेंद्र फडणवीस व अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा : प्रशांत जगताप

PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदाच्या पदोन्नती साठीची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध

| अंतिम सेवाज्येष्ठता यादी शारीरिक तपासणी नंतर

PMC Security Officer Promotion | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडील सुरक्षा विभागाकडील सुरक्षा अधिकारी (PMC Security Department) – (वर्ग-२) या पदाच्या एकूण संख्येच्या ७५% जागा कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 23 लोकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 13 पात्र तर 10 अपात्र ठरले आहेत. त्याची यादी महापालिका वेबसाईट (PMC Website) वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.  महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. दरम्यान अंतिम सेवाज्येष्ठता यादी ही शारीरिक तपासणी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (PMC Pune Employees promotion)
 सुरक्षा अधिकारी (वर्ग-२) या पदाकरिता सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांमधील तपशीलानुसार पात्र/अपात्र सेवकांची तयार
करण्यात आलेली सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची सेवाज्येष्ठता यादी पुणे
महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावरील परिपत्रक प्रणालीवर (PMC Website Circular System) प्रसिध्द करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठता यादीतील सेवक/कर्मचारी यांनी स्वतःचे नांव, जात, जातीचा गट, शैक्षणिक पात्रता, जन्मदिनांक, नेमणूकीचे दिनांक इ. सर्व बाबींची पाहणी करुन आपल्या नावांसमोर स्वाक्षरी करावी. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. (PMC Security Department)
पात्र/अपात्र सेवाज्येष्ठता यादीमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीबाबत काही आक्षेप/चुका असल्यास ७ दिवसाचे मुदतीत आपले आक्षेप लेखी स्वरुपात, कागदपत्रांच्या पुराव्यासहीत आस्थापना विभाग, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. त्यानुसार सदरच्या नोंदी घेवून व सदर पदाकरिता सुधारीत सेवाप्रवेश नियमामध्ये नमूद प्रमाणे उमेदवारांची शारिरीक तपासणीच्या अधीन राहून अंतिम पात्र सेवकांची सेवाजेष्ठता सूचीस मान्यता घेवून ती प्रसिध्द करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अंतिम पात्र सेवकांची सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्त्या सुचविण्यात आल्यास त्यांची दखल घेतली जाणार नाही व संबंधित सेवक/कर्मचारी यांचे शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राबाबत तक्रार आल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सेवक/कर्मचारी यांची नेमणूक कोणत्याही टप्प्यावर संपुष्टात आणणेबाबत आलाहीदा निर्णय घेण्यात येईल. असे आदेशात म्हटले आहे.