PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती

HomeBreaking Newsपुणे

PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती

कारभारी वृत्तसेवा Dec 16, 2023 3:36 PM

Recruitment | जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 
PMC pune | Transfers | महापालिकेत तब्बल 6 वर्षांनी होणार बदल्या! |  मात्र राजकीय नेते पूर्ण समाधानी नाहीत 
Appointment and promotion of Junior Engineers | आता महापालिका कनिष्ठ अभियंत्यांच्या नेमणुकीच्या व पदोन्नतीच्या पद्धतीत बदल

PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती

| अभियांत्रिकी सेवा क्लास 1 आणि 2 साठी 100% पदोन्नती

PMC Engineering Cadre Promotion | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. तर अभियांत्रिकी सेवा क्लास 1 आणि 2 साठी 100% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. यामध्ये 25% भरती रद्द करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये अभियांत्रिकी वर्गाला पूर्णपणे न्याय देण्यात आला असून लेखनिकी संवर्गाच्या संधी मात्र एक प्रकारे हिरावून घेतल्या जात आहेत. (PMC Employees Promotion)
पुणे महापालिका आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता वर्ग 1 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी), उप अभियंता वर्ग 2 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता वर्ग 3 (वाहतूक नियोजन/ स्थापत्य/ विद्युत यांत्रिकी) या पदांच्या नेमणुकीत बदल करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्ताकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी -छापवाले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune News)
यानुसार कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. वास्तविक सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाते. मात्र पदोन्नती साठी JE ना परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी 5 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सेवकांवर यामुळे अन्याय होणार आहे. कारण 5 वर्ष अनुभव असलेला नवीन सेवक देखील पदोन्नती घेऊ शकणार आहे. मात्र पदोन्नती घेण्यासाठी ऐन वेळेला पदव्या घेणाऱ्या लोकांवर यामुळे चाप बसणार आहे. (Pune PMC)
अभियांत्रिकी सेवा वर्ग 1 आणि 2 मधील अधिकाऱ्यासाठी 100% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. यातील 25% भरती अर्थात नामनिर्देशन रद्द करण्यात आले आहे. यातील 75% पदोन्नती ही पदवी धारण करणाऱ्यासाठी असेल तर 25% पदोन्नती पदविका धारण करणाऱ्यासाठी असेल. यासाठी 3 वर्षाची नियमित सेवा आवश्यक असणार आहे. (PMC Pune Marathi News)
दरम्यान या दुरुस्त्या केल्याने अभियांत्रिकी संवर्गचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच नवीन भरती देखील होऊ शकणार आहे. मात्र यामुळे लेखनिकी संवर्गाचे नुकसान होणार आहे, असे बोलले जात आहे. कारण अभियांत्रिकी संवर्गातील लोक लेखनिकी संवर्गात येऊ शकतील. ते क्षेत्रीय अधिकारी होऊ शकतील. मात्र लेखनिकी संवर्गातील लोकांना मात्र त्यामानाने कमी संधी मिळणार आहे. याबाबत प्रशासनाकडून कुठली काळजी घेण्यात आलेली नाही.