Pedestrian Day | PMC Pune | पुणे महापालिका  ११ डिसेंबर  पादचारी दिवस म्हणून साजरा करणार

HomeपुणेBreaking News

Pedestrian Day | PMC Pune | पुणे महापालिका  ११ डिसेंबर  पादचारी दिवस म्हणून साजरा करणार

कारभारी वृत्तसेवा Dec 07, 2023 1:05 PM

Selfie with Navadurga |  “नवदुर्गाचा सन्मान” व “सेल्फी विथ नवदुर्गा” या कार्यक्रमांचे आयोजन | पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा नवरात्रोत्सवाच्या काळात उपक्रम
Mahametro Contract Employees ESIC | महामेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आता ESIC चा लाभ
Transfers | Nana Bhangire | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी

Pedestrian Day | PMC Pune | पुणे महापालिका  ११ डिसेंबर  पादचारी दिवस म्हणून साजरा करणार

 

Pedestrian Day | PMC Pune | रस्त्यावर चालणारे नागरिक म्हणजेच पादचारी हे रस्त्यावरील सर्वात महत्वाचे घटक असून तसे दुर्लक्षित आहेत. आपल्या देशात रस्त्यावरील अपघातांमध्ये चालणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. पादचारी सुरक्षा व अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी , तसेच पादचारी (ज्यात प्रामुख्याने लहान मुले , वृद्ध / म्हातारी माणसे , स्त्रिया तसेच अंध ,अपंग, विकलांग नागरिक) यांच्या बाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी दर वर्षी ११ डिसेंबर रोजी पादचारी दिवस साजरा करणारी पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation)  देशातील पहिली महापालिका आहे. (Pedestrian Day | PMC Pune)

या कार्यक्रमात पुणे मनपा बरोबर पुणे वाहतूक पोलीस , लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना, पथारीवाले संघटना यांचे सहकार्य फार महत्वाचे आहे. यांच्या
सहभागा व सहकार्यामुळे या वर्षी देखील सोमवार ११ डिसेंबर २०२३ रोजी पुणे महानगरपालिका सलग तिसऱ्यांदा हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहे. चालण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित पदपथ ,रास्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग ज्यात नियमित रंगवलेले झेब्रा पट्टे , रस्त्याच्या मध्ये उभे राहण्यासाठी बेट ज्यांना रेफुजी आयलंड म्हणतात, सिग्नल , माहिती फलक, पथदिवे इत्यादी हे पादचारी सुरक्षे बाबत चे उपाय रस्त्याचा अतिमहत्त्वाचा घटक आहेत तसेच पादचाऱ्यांचा अधिकार देखील आहे.

दर वर्षी पुणे महानगरपालिका पथ विभाग या दिवसाचे आयोजन करतो. आपल्या पुणे शहरातील सर्वात प्रतिष्ठित व गर्दीचा रस्ता म्हणजे लक्ष्मी रस्ता असल्याने तिथे या दिवसाचे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. याच बरोबर पुण्यातील 100 महत्वाच्या चौकात पादचारी सुरक्षे बाबत उपाय केले जात आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक हा भाग वाहन- विरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजावण्याचे काम पथ विभागामार्फत करण्यात येईल. या दिवशी सोमवार असल्याने सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत हा रस्ता वाहनांना वापरता येणार नाही. या दिवशी जास्तीत जास्त नागरिक लक्ष्मी रस्त्यावर यावेत या करीत महामेट्रो मार्फत डेक्कन मेट्रो स्थानक व पुणे मनपा मेट्रो स्थानकापासून खास सायकलींचे आयोजन करण्यात येत आहे तसेच पी.एम.पी.एम.एल मार्फत ज्यादा बस सेवा पुरविण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी लक्ष्मी रस्ता ;वॉकिंग प्लाझा; चा आनंद घेण्यासाठी
चालतच यावे व वाहन धारकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन पुणे मनपा ने केले आहे.

या दिवशी लोकप्रबोधनासाठी व नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन ही केले जात आहे

 

काही प्रमुख कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत.

-सेव किड्स फौंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षा बाबत कार्यशाळा

-एकांश ट्रस्ट तर्फे अंध अपंग नागरिक यांच्या बाबत संवेदनशीलता व सार्वत्रिक प्रवेशयोग्यते विषयक कार्यशाळा
– सेव पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट तर्फे पादचारी अधिकारांबाबत कार्यशाळा
– परिसर संस्थे मार्फत सार्वजनिक वाहतूक व जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन
– आई.टी.डी.पी संस्थे मार्फत रस्त्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन
– साथी हाथ बढाना संस्थे मार्फत मानसिक आरोग्याबाबत पथनाट्य
– रंग कला अकादमी तर्फे पादचारी दिनाबाबत भव्य रांगोळी
– इतिहास प्रेमी नागरिकांसाठी शौर्य खेळ
– रास्ता संस्थेमार्फत संगीत व वाद्य कला सादरीकरण
– पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थे मार्फत प्रदर्शन

याच बरोबर सामान्य नागरिकांना देखील आपली काही कला सादर करायची असल्यास लक्ष्मी रस्ता वॉकिंग प्लाझास्टेज त्यांच्या साठी खुले आहे त्यामुळे त्यांनी मनपातील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सादरीकरण करावे असे आवाहन पुणे मनपाने केले आहे.

या दिवसाच्या निमित्ताने नुकतेच १०० वर्ष पूर्ण झालेल्या लक्ष्मी रस्त्याला एक नवे रूप येणार आहे. लोकांनी खासगी गाड्यांचा वापर कमी करावा , चालण्याचा आनंद घ्यावा या साठी सर्व रस्ते स्वच्छ सुरक्षित व आकर्षक व्हावे असे आपले राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण सांगते. पुणे महानगरपालिकेलने
मागील काही वर्षात  शहरी रस्ते रचना नियमावलीसुरक्षित रस्ते धोरण, गतिरोधक नियमावली, शालेय विद्यार्थी प्रवास योजना अश्या अभिनव संकल्पना राबविल्या व शहरातील प्रमुख रस्ते यांचा कायापालट करून दाखवला आहे. अजून बरेच काम करायचे आहे , येणाऱ्या काळात मेट्रो व सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी व खासगी वाहनांचे प्रमाण कमी करण्यासाठी चालणे हा पर्याय अधिक महत्वाचा ठरणार आहे त्या दृष्टीने पादचारी दिन हा पुणे मनपाने सुरु केलेला महत्वाचा उपक्रम आहे.