MLA Sunil Tingre | म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेमुळे सदनिकाधारकांची होणार आर्थिक भुर्दंडापासून मुक्तता
| वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी विधिमंडळात केलेल्या मागणीला यश
MLA Sunil Tingre | म्हाडा वसाहतींच्या (MHADA Building) पुनर्विकास करताना सदनिका घेतली त्या वेळच्या रेडीरेकनर (Ready Reckoner) नुसार स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) आकारावी अशी प्रमुख मागणी आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी वारंवार निवेदने व विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून केली होती.
अनेक वर्षापासून म्हाडाच्या वसाहती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या, ह्यातील मूळ समस्या ही आकारण्यात येणारा दंड व नव्या रेडीरेकनर नुसार भरावी लागणारी स्टॅम्प डुटी ह्या होत्या.यामुळे होणाऱ्या आर्थिक भुर्दंडामुळे सदनिका धारक त्रस्त होते.
परंतु मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा प्रमुख प्रश्न निकाली निघाला असून म्हाडा वसाहती पुनर्विकास करताना सदनिका खरेदी केल्याचा वेळी असणारा रेडीरेकनर दरानुसार स्टॅम्प ड्युटी आकारण्यात येणार असून भरावा लागणाऱ्या दंडापासून नागरिकांची मुक्तता होणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या ह्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल सरकारचे आभार. असे आमदार टिंगरे यांनी म्हटले आहे.