Viksit Bharat Sankalp Yatra | विकसित भारत संकल्प यात्रा – शहरी मोहीम बाबत पुणे महापालिकेचे पुणेकरांना हे आहे आवाहन
Viksit Bharat Sankalp Yatra | केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी 28 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” चे केंद्र शासनाकडून आयोजन करण्यात आले आहे. यात्रा पुणे शहरातील 125 स्थळांमधून फिरणार आहे. याकरिता केंद्र शासनाकडून आयइसी मोबाइल थिएटर व्हॅन(IEC Mobile Theatre Van) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) करण्यात आले आहे. (Viksit Bharat Sankalp Yatra)
विकसित भारत संकल्प यात्रेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत
न पोहोचलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे – विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या असुरक्षित लोकांपर्यंत पोहोचणे
माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे
नागरिकांशी संवाद – सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांच्या वैयक्तिक कथा/अनुभव शेअरिंगद्वारे संवाद
यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी.
सदर विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ व उद्घाटन कार्यक्रम कसबा गणपतीच्या मंदिराजवळ, कसबा पेठ, पुणे येथे 28 नोव्हेंबर 2023 सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन महिने पुणे शहरांमधील विविध 125 ठिकाणी IEC Mobile Theatre Van च्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत केंद्र शासन पुरस्कृत योजना पोहोचविणे, जनजागृती करणे, लाभार्थ्यांशी संवाद साधणे , नवीन लाभार्थी यांची नोंदणी करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
त्या ठिकाणांची IEC Mobile Theatre Van स्थळांची यादी सोबत जोडली आहे. प्रत्येक स्थळावर साधारण तीन तास गाडी थांबवण्यात येईल. यासाठी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
पुणे महापालिकेतर्फे ऑन स्पॉट कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
पीएम-स्वनिधी शिबिर
प्रधानमंत्री आयुष्यमान योजना शिबिर
आरोग्य शिबिर
आधार अपडेट शिबिर
प्रधानमंत्री उज्वला गॅस शिबिर
1. प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी (स्वनिधी) शिबिर
नवीन अर्जांची नोंद करणे
पात्र विक्रेत्यांची यादी अंतिम करणे
प्रलंबित कर्ज प्रकरणे बँकांच्या साहाय्याने वितरित करणे
आधार माहितीसह विक्रेत्यांचे तपशील गोळा करणे
मंजूर किंवा नाकारलेल्या अर्जाची स्थिती लिंक करणे आणि अपडेट करणे
स्वनिधी से समृद्धी अंतर्गत कॅम्पचे आयोजन करून पथविक्रेत्यांचे सामाजिक व आर्थिक प्रोफाइलिंग करणे तसेच या योजनेचा लाभ देणे.
2. प्रधानमंत्री आयुष्यमान योजना शिबिर
या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतात.
त्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून देणे.
आयुष्मान भारत कार्डसाठी शहरी नागरिकांची नोंदणी
आयुष्मान कार्ड देणे
3. आरोग्य विभाग- PMC द्वारे आरोग्य शिबिर
NCD स्क्रीनिंग – उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय; टी
बी तपासणी
नियमित आरोग्य तपासणी (OPDs)
आरोग्यविषयक धोके ओळखण्यासाठी विविध चाचण्या केल्या जाऊ शकतात
4. प्रधानमंत्री उज्वला योजना शिबिर
यामध्ये सर्व गॅस कंपनी मार्फत माहिती बायोमॅट्रिक करणे आणि मंजूर करणे
काही बदल करायचे असतील तर करणे, नवीन गॅस कनेक्शन देणे तसेच
उज्वला गॅस नवीन कनेक्शन देणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत
5. आधार अपडेट शिबिर
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने शहरी भागातील नागरिकांना आधार कार्ड दुरुस्त करणे, आधार अपग्रेडेशन करणे, इत्यादी बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
IEC Mobile Theatre Van वेळ व स्थळाचा तक्ता पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.