Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

HomeपुणेBreaking News

Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

कारभारी वृत्तसेवा Nov 23, 2023 1:48 PM

Mahayuti Government | महायुती सरकारचा शपथविधी ठरला |जाणून घ्या तारीख 
Sharad Pawar on EVM | शरद पवार यांनी जाणून घेतली बाबा आढाव यांची भूमिका!
Dr Kumar Ketkar | भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम | डॉ. कुमार केतकर यांचे प्रतिपादन

Recruitment News | नगर रचना विभागाच्या शिपाई पदाची परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी

|संकेतस्थळावरुन प्रवेशपत्रे डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन

 

Recruitment News | नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून उमेदवारांनी त्यांची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून घ्यावीत, असे आवाहन नगर रचना विभागाने केले आहे.

शिपाई पदाच्या परीक्षेची उद्घोषणा नगर रचना विभागाने यापूर्वीच त्यांच्या संकेतस्थळावर केली आहे. अर्ज सादर करतेवेळी सहायक पुरविण्याची मागणी केलेल्या दिव्यांग उमेदवारांना विभागातर्फे परीक्षा केंद्रावर सहायक उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

परीक्षेची प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आलेली असून ती प्रवेशपत्रे उमेदवारांनी त्वरित डाऊनलोड करुन सर्व उमेदवारांनी परीक्षेस उपस्थित राहण्याचे आवाहन, नगर रचना पुणे विभागाचे सहसंचालक तथा राज्यस्तरीय निवड समितीचे (गट ड) अध्यक्ष स. म. पवार यांनी केले आहे.