Pittsburgh Maharashtra Board | Rahul Deshmukh | पिट्सबर्ग महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक सभासद बैठकीत अध्यक्षपदी राहुल देशमुख यांची बिनविरोध निवड
Pittsburgh Maharashtra Board | Rahul Deshmukh | पिटसबर्ग, अमेरिका (Pittsburgh America) येथील महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकारी संचालक यांच्या वार्षिक निवडणुकीत पुण्याचे श्री. राहुल देशमुख (Rahul Deshmukh) यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच त्यांच्या पॅनल मधील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. श्री.यशोधन डोंगरे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्री. गिरीश गोडबोले आणि श्री महेश साने यांनी काम पाहिले.
अध्यक्षीय भाषाणात पुढील वर्षातील वाटचाल आणि अमेरिकेतील मराठी मुलांमध्ये मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार याबद्दलचे मनोगत आणि आराखडे सादर केले. मंडळाच्या सर्व सभासदांनी नवीन समिती चे अभिनंदन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
पॅनल मधील इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे
अरुण जातकर – मार्गदर्शक
प्रज्ञा जोशी – खजिनदार
ऋषिकेश जोशी – सचिव
रितू वैद्य – संचालक
नारायण राऊत – संचालक
निखिल देवकुळे – संचालक
विवेक जोशी – संचालक
रुपाली थोडसरे – संचालक