Women Toilet | PMC Bibwewadi Ward Office | महर्षी नगर परीसरात महिलांसाठी नवीन शौचालय ची व्यवस्था करा | योगिता सुराणा यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी 

HomeपुणेBreaking News

Women Toilet | PMC Bibwewadi Ward Office | महर्षी नगर परीसरात महिलांसाठी नवीन शौचालय ची व्यवस्था करा | योगिता सुराणा यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Oct 13, 2023 2:01 PM

Ganesh Idol PMC Pune | गणेशोत्सवात ५ लाख ५९ हजार ९५२ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ७ लाख ६ हजार ४७८ किलो जमा झाले निर्माल्य!
MLA Sunil Kamble | भव्य बाईक रॅलीने आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचाराची सांगता
PMC – PCMC Election 2025 | प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर | अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला 

Women Toilet | PMC Bibwewadi Ward Office | महर्षी नगर परीसरात महिलांसाठी नवीन शौचालय ची व्यवस्था करा | योगिता सुराणा यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

 

Women Toilet | PMC Bibwewadi Ward Office | महर्षी नगर परीसरात (Pune Maharshi Nagar)  महिलांसाठी नवीन शौचालय (Toilet for Women) ची व्यवस्था करावी अशी मागणी पुणे शहर महिला कॉंगेस कमिटीच्या (Pune Shahar mahila Congress) वतीने पुणे महापालिका प्रशासनाकडे (Pune Municipal Corporation) करण्यात आली.

महर्षिनगर – प्रभाग क्र. २८ मध्ये महर्षिनगर, मुकुंदनगर या परीसरात महिलांसाठी शौचालय ची व्यवस्था नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या महिलांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. त्याची यापूर्वी तक्रार देखील  करण्यात आली होती. परंतू त्या तक्रारीवर निर्णय घेण्यात आला नाही. या परिसरात नवीन शौचालय ची व्यवस्था करावी अशी मागणी योगिता सुराणा, महिला सरचिटणीस पुणे शहर कॉंग्रेस कमिटी यांनी  आयुक्त, पुणे महानगरपालिका उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग,  सह आयुक्त बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय यांच्याकडे केली.

सदर तक्रारीची त्वरीत दखल न घेतल्यास पुणे शहर महिला कॉंगेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी व या परीसारात त्वरीत महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करावी अशी मागणी  योगिता सुराणा सरचिटणीस पुणे शहर महिला कॉग्रेस कमिटी ,बेबीताई राऊत,संगीता उपाध्याय,शर्मिला जैन स्थानिक महिला नी निवेदन दिले.