PMC Solid Waste Management Department | दसरा, दिवाळी सणात जमा होणाऱ्या कचऱ्याबाबत पुणे महापालिकेचे विधायक पाऊल!

HomeपुणेBreaking News

PMC Solid Waste Management Department | दसरा, दिवाळी सणात जमा होणाऱ्या कचऱ्याबाबत पुणे महापालिकेचे विधायक पाऊल!

Ganesh Kumar Mule Oct 10, 2023 2:07 PM

Maratha Samaj Survey | मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण
Lift | महापालिकेचे क्लास वन अधिकारी लिफ्ट मध्ये पडले अडकून | अर्धा तासपर्यंत मदत मिळाली नाही 
Pune Politics | शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

PMC Solid Waste Management Department | दसरा, दिवाळी सणात जमा होणाऱ्या कचऱ्याबाबत पुणे महापालिकेचे विधायक पाऊल!

| घनकचरा व्यवस्थापन विभाग राबवणार महाअभियान

 

PMC Solid Waste Management Department |दसरा, दिवाळी (Diwali) व विविध सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर घरातील जुन्या वस्तू, फर्निचर बदलले जातात. त्याचप्रमाणे गाद्या उश्या यांचा कचरासुद्धा मोठ्या प्रमाणावर साठून राहतो. अश्या प्रकारचा कचरा इतःस्ततः पडू नये याकरिता पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) विधायक पाऊल उचलले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत सणसमारंभाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महाअभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार हा कचरा गोळा करून पुणे महानगर पालिकेच्या सिस्टीममध्ये आणला जाणार आहे.  त्यावर थ्री आर (RRR – Reduce, Reuse and Recycle) संकल्पना राबविली जाणार आहे. याकरिता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खालीलप्रमाणे संकलन मोहीमा आयोजित करण्याचे आदेश उपायुक्त संदीप कदम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. (PMC Pune)

 

असे आहेत आदेश

१. दिनांक १४/१०/२०२३ चिंध्या, उश्या गाद्या व फर्निचर या करिता प्रत्येक प्रभागनिहाय किमान ०२ आरोग्य कोठ्यांची जागा निश्चित करण्यात यावी व त्याची माहिती दि. ११/१०/२०२३ पर्यंत वॉर रूम ला कळवावी. याठिकाणी  १४/१०/२०२३ रोजी स. १०:०० ते दु ०४:०० या वेळेत सदर वस्तू गोळा करण्यात याव्यात व तदनंतर निश्चित केलेल्या ठिकाणी या वस्तूंची वाहतूक करण्यात यावी.
२. दिनांक २८/१०/२०२३ व २९/१०/२०२३ देवीदेवतांसंबंधित सर्व वस्तू/ साहित्य याकरिता क्षेत्रीय कार्यालय निहाय १ जागा निश्चित करावी व त्याची माहिती दि. १६/१०/२०२३ पर्यंत वॉर रूम ला कळवावी. याठिकाणी दि. २८/१०/२०२३ व २९/१०/२०२३ रोजी स. १०:०० ते दु ०४:०० या वेळेत सदर वस्तू गोळा करण्यात याव्यात व तदनंतर निश्चित केलेल्या ठिकाणी या वस्तूंची वाहतूक करण्यात यावी. तसेच सन्मानपूर्वक सदर वस्तू निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी पोहचविण्यात याव्यात.
३. दिनांक ०५/११/२०२३ घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पुणे महानगरपालिका, जनवाणी, कमिन्स इंडिया, पूर्णम इकोव्हीजन, सागर मित्र थंब क्रिएटीव्ह, आदर पूनावाल क्लीन सिटी इनिशिएटीव्ह व इतर शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ई. कचरा व प्लास्टिक कचरा संकलन दि. ०५/११/२०२३ रोजी स.०९:०० ते दु. ०१:०० या वेळेत शहरातील विविध ३०० ठिकाणी ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन महाअभियान राबविण्यात येणार आहे.
आपल्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलनाच्या केंद्राबाबाटची सविस्तर माहिती संबंधित संस्थांशी समन्वय साधून उपलब्ध करून घ्यावी. या ठिकाणांबाबत  जास्तीत जास्त नागरिकांना अवगत करून या महाअभियानात सहभागी होणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

वरील सर्व मोहिमांना अनुकूल प्रतिसाद मिळणेकरिता, नागरिक मोहल्ला कमिटी सदस्य, स्वयंसेवी संस्था यांचेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. या सर्व मोहिमांची माहिती सोशल मिडिया व सर्व प्रसारमध्यमांदवारे नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. आपल्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या प्रत्येक संकलन मोहिमेच्या ठिकाणी अभिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करून जबाबदारी निश्चित करावी. क्षेत्रीय कार्यालय निहाय संकलन मोहीम अहवाल त्याच दिवशी सायं ०५:०० वाजेपर्यंत घनकचरा व्यवस्थापन वॉर रूम ला सादर करावा. असे आदेश उपायुक्त कदम यांनी दिले आहेत.

———-