PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवा | शहर राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी
PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या (PMC Shahari Garib Yojana) उपचारांची मर्यादा 2 लाखापर्यंत वाढवण्यात यावी. तसेच दुर्धर आजारांसाठी अडीच लाखापर्यंत उपचार देण्यात यावेत. अशी राष्ट्रवादी काँग्रेस कडून (NCP Pune) शहर अध्यक्ष दीपक मानकर (Dipak Mankar) आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव (Bhaiyyasaheb Jadhav) यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार महापालिकेकडून (PMC Pune) शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठीची उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून 1 लाख 60 हजार रूपये केली आहे. त्यामुळे शहरातील गरजू व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. महापालिकेने 2011 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत अद्यापही नागरिकांना 1 लाख रूपयां पर्यंतचे उपचार महापालिकेच्या पॅनेलवरील रूग्णालयात मिळतात. तर काही दुर्धर आजारांसाठी 2 लाखांचे उपचार मिळतात. मात्र, वैद्यकीय उपचाराचा वाढलेला खर्च तसच महागाई लक्षात घेऊन उपचाराच्या खर्चाची मर्यादाही वाढविणे आवश्यक असून या योजनेतील कार्डधारकांना सरासकट 2 लाखांचे उपचार मिळावेत तसेच दुर्धंर आजारासाठी अडीच लाखां पर्यंत उपचार केले जावेत. महापालिकेत लोकप्रतिनिधीं नसल्याने शहराचे प्रशासक म्हणून आपल्या पातळीवर हा निर्णय घेतल्यास सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा मिळणार असून याबाबत आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत. असे निवेदनात म्हटले आहे.
—-