NCP Pune Dahihandi | राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर कडून दु:शासनाची दहीहंडी

HomeBreaking Newsपुणे

NCP Pune Dahihandi | राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर कडून दु:शासनाची दहीहंडी

Ganesh Kumar Mule Sep 06, 2023 3:30 PM

Bhaiyyasaheb Jadhav | Gopichand Padalkar | पडळकरांच्या अप्रगल्भ वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही | राष्ट्रवादी प्रवक्ते भैयासाहेब जाधव
NCP Pune | Agitation | महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निषेध आंदोलन
NCP Vs Governor | Pune | काळे मन हेच भाजपचे अंतर्मन! | अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

NCP Pune Dahihandi | राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर कडून दु:शासनाची दहीहंडी

NCP Pune Dahihandi | न्याय प्रस्थापित करण्यासाठी अन्यायाचे दमण करणारे भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जातो.  पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही दरवर्षी प्रबोधनात्मक दहीहंडी साजरी केली जाते. यवर्षीही दहीहंडी च्या पूर्वसंधेला ही दहीहंडी फोड़न्यात आली. प्रतीकात्मक दमण म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज “दुःशासनाची दहीहंडी” फोडण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. (NCP Pune Dahihandi)
याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितले कि, देशातील सध्याची राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती बघता यावर्षी दहीहंडीच्या माध्यमातून एक संदेश देत अभिनव पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचे योजिले आहे. देशात सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे, भरीस भर म्हणून न भूतो न भविष्यती एवढी प्रचंड बेरोजगारी सध्या आपल्या देशात आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या कात्रीत सापडलेली जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. हा मूलभूत प्रश्न सोडवणे ही केंद्र सरकारची प्राथमिक जबाबदारी असतानाही केंद्रातील मोदी सरकार मात्र राजकीय फायद्यासाठी समाजात धार्मिक तेढ वाढीस लावणे, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना नामोहरम करणे अशा दुष्कर्मांमध्ये व्यस्त आहे. मणिपूर, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात आपल्या बंधू भगिनींना प्राण गमवावे लागले, आपल्या माता भगिनींवर देशभर अत्याचार सुरु आहेत, शेतकरी कुठे अतिवृष्टीने तर कुठे दुष्काळाने हैराण आहेत. देशभर अशी बिकट अवस्था असतानाही मोदी सरकार मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून सत्ता उपभोगत आहे. मोदी सरकारच्या या पापांचा घडा आता काठोकाठ भरत आला आहे. याचेच प्रतीकात्मक दमण म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज “दुःशासनाची दहीहंडी” फोडण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी प्रशांत जगताप , रवींद्र मालवदकर, किशोर काम्बले, अजिंक्य पालकर, मृणालताई वाणी, फईम शैख, दीपक कामठे, जावेद ईनामदार, पूजा काटकर, वैभव कोठुले, अजय पवार, आसिफ शैख, शरद दबडे आदि पदाधिकारीं आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते .