Ajit Pawar | लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा   | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

HomeBreaking Newsपुणे

Ajit Pawar | लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Ganesh Kumar Mule Sep 06, 2023 1:37 PM

BRTS | MLA Sunil Tingre | नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन वाहतुक कोंडी सोडवा | आमदार सुनिल टिंगरे यांची लक्षवेधीतून विधानसभेत मागणी
Oxygen Park : MLA Sunil Tingre : खराडी-वडगावशेरी परिसरामध्ये 7 एकर परिसरात ऑक्सीजन पार्क विकसित होणार : आमदार सुनील टिंगरे
MLA Sunil Tingre | सिध्दार्थनगर वासियांचा 14 वर्षांचा वनवास अखेर संपला |आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Ajit Pawar | लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील (Lohgaon) नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील 6 एकर जागेत 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय (Sub District Hospital) व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून रुग्णालयाची उर्वरित कामे येत्या जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी आज दिले.

 

पुणे जिल्ह्याच्या लोहगाव (ता. हवेली) येथील उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थान बांधकामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतला. बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (Nitin Kareem), कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, पुण्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोहगाव परिसरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. रुग्णालयाचे बांधकाम, आतील फर्निचरसह इतर सोयीसुविधा, रुग्णांवर उपचारासाठी साधने, आरोग्ययंत्रणा, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी,असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

============
येरवडा आयटीआयची (Yerwada ITI) उभारणी जलद करा – उपमुखमंत्र्यांचे निर्देश

पुणे जिल्ह्यातील येरवडा आणि हवेली येथील नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी जलद गतीने करावी. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणे परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रम शिकविण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व स्थानिक गरजा विचारात घेऊन इंडस्ट्री ४.० अंतर्गत रोबोटिक्स, सीएनसी मशीन हँडलिंग, मेकॅनिक्स यासारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत. यामुळे परिसरात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी निकडीची पदे तात्काळ भरण्याची प्रक्रिया सुरू करा. असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत.
या बैठकीची मागणी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी केली होती.
******