Former Corporator Vidya Bhokre | माजी नगरसेविका विद्या भोकरे यांचे निधन

HomeपुणेBreaking News

Former Corporator Vidya Bhokre | माजी नगरसेविका विद्या भोकरे यांचे निधन

Ganesh Kumar Mule Aug 24, 2023 1:01 PM

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा 
Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद
PMC CHS Card | एका CHS कार्डवर कर्मचारी किंवा सभासदांना आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाच लाभ घेता येणार | एकाचवेळी चौघांना लाभ न देण्याचा CHS कमिटीचा निर्णय

Former Corporator Vidya Bhokre | माजी नगरसेविका विद्या भोकरे यांचे निधन

 

Vidya Bhokre | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) माजी नगरसेविका व कॉंग्रेस (Congress party) पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्या श्रीमती विद्या जयंत भोकरे (वय ५८वर्षे)यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले. (Vidya Bhokre) 

त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली,जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. १९९७ ते २००२ आणि२००७ ते २०१२ या कालावधीत कॉंग्रेस पक्षातर्फे त्या कसबा पेठेतून निवडून आल्या होत्या. महानगरपालिकेत विविध समित्यांमध्ये त्यांनीकाम केले असून कसबा पेठेतील जुन्या वाड्यांचे प्रश्नसोडविण्यासाठी त्यांचा मोठा पुढाकार होता. कसबा पेठेतील राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या त्याप्रमुख कार्यकर्त्या होत्या. त्यांचे पती कै. जयंत भोकरे हे १९९२ ते१९९७ आणि २००२ ते २००७ या कालावधीत कसबा पेठेतून कॉंग्रेस उमेदवार  म्हणून विजयी झाले होते.


News Title | Vidya Bhokre, Former Corporator Vidya Bhokre, Pune Municipal Corporation, PMC Pune, Pune News