Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा  | ८० जणांचे रक्तदान  | महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम

HomeBreaking Newsपुणे

Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा | ८० जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम

Ganesh Kumar Mule Aug 16, 2023 1:20 PM

Blood Donation Camp | खून देना अहिंसा है | १५ ऑगस्टला पुण्यात महाराष्ट्र अंनिस कडून रक्तदान शिबिराचे आयोजन
Dr Narendra Dabholkar | डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्यदिनी अंनिसचे रक्तदान शिबीर
Blood donation camp : सांगवी परिसर महेश मंडळाच्या २५ व्या रक्तदान शिबिरात २३२ रक्तदात्यांचे रक्तदान 

Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा  | ८० जणांचे रक्तदान

| महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम

Narendra Dabholkar | खून करणे ही हिंसा आहे, तर खून देऊन इतरांचे प्राण वाचवणे ही अहिंसा आहे, असा संदेश देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti) संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar) यांना 80 जणांनी रक्तदान करून अभिवादन केले.

 स्वातंत्र्यदिनी एस एम जोशी सभागृह येथे महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यंदा या शिबीराचे हे तिसरे वर्ष होते. शिबिरासाठी 203 जणांची नोंदणी होऊन त्यातून 80 जणांनी रक्तदान केले, अशी माहिती या शिबीराचे समन्वयक विशाल विमल यांनी दिली. डॉक्टर दाभोलकर यांना रक्तबंबाळ करून त्यांचा प्राण घेणाऱ्या हिंसक प्रवृत्तीला, दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवण्याची थेट कृती हे अहिंसात्मक, मानवतावादी उत्तर आहे, असेही विशाल विमल यांनी सांगितले.

शिबिरामध्ये विविध क्ष्रेत्रातील मान्यवर व नागरिक सहभागी झाले होते. संशोधक लेखक साहित्यिक अच्युत गोडबोले, राज्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, मानव कांबळे, साहित्यिक आसावरी निफाडकर, प्रकाशक शरद अष्टेकर, राज्य अधिकारी मनीषा गंपले, प्राध्यापक प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाला जागा आणि व्यवस्था एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने उपलब्ध करून दिली. रमेश धर्मावत, प्रांजल पाठक यांचे सहकार्य लाभले. ससून रक्त पेढीने रक्तसंकलनास सहकार्य केले. शिवाजीनगर शाखेच्या कार्यकर्त्यानी अत्यन्त चिकाटी, निष्ठेने उपक्रम पार पाडला. संयोजनामध्ये माधुरी गायकवाड, स्वप्नील भोसले, आकाश छाया, रविराज थोरात, प्रतीक कालेकर, श्याम येणगे, विनोद लातूरकर, एकनाथ पाठक, सतीश जाधव, मयूर पटारे, कपिल क्षीरसागर, अविनाश इंगळे, अक्षय दावडीकर, प्रवीण खुंटे, लालचंद कुंवर, निशांत धाइंजे, रविकिरण काटकर, रवी आमले, प्रिया आमले, निखिल सुक्रे, मनोहर पाटील आदी कार्यकर्ते सक्रिय होते.

—–

दहा वर्षे खूनाची, कार्यरत विवेकी असंतोषची…!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला यावर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, अजूनही त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी सायं. ५-३० वाजता विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे स्मृतिजागर, २० ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे स्मृतिजागर आणि तेथून एस एम जोशी सभागृहापर्यन्त मूकमोर्चा आणि त्यानंतर सकाळी 9-30 वाजता एस एम जोशी सभागृह येथे विवेक निर्धार मेळावा होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल, महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष माधव बावगे उपस्थित असणार आहेत.
——–