Ek Pune Card | Pune Metro | “एक पुणे कार्ड”: पुणे मेट्रोने प्रवास होणार सोयीचा

HomeBreaking Newsपुणे

Ek Pune Card | Pune Metro | “एक पुणे कार्ड”: पुणे मेट्रोने प्रवास होणार सोयीचा

Ganesh Kumar Mule Aug 12, 2023 12:44 PM

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण | जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन
PM Modi Wishesh Pune Metro : पंतप्रधान मोदींनी पुणे मेट्रोला दिल्या शुभेच्छा  : वाचा शुभेच्छा पत्र जसेच्या तसे 
Pune Metro News | जनतेच्या पैशावर भाजपचा प्रचार | आयजी च्या जीवावर बायजी उदार | माजी आमदार मोहन जोशी

Ek Pune Card | Pune Metro | “एक पुणे कार्ड”: पुणे मेट्रोने प्रवास होणार सोयीचा

| पुणे मेट्रोच्या बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण

Ek Pune Card | Pune Metro | आज चांदणी चौक येथे “एक पुणे कार्ड” या पुणे मेट्रोच्या (Pune Metro) बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari), महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या कार्डचे लोकार्पण पार पडले. कार्यक्रमास विधान परिषदेच्या उप सभापती डॉ नीलम गोऱ्हे, खासदार श्री. श्रीरंग बारणे, आमदार राहुल कुल, माधुरी मिसळ, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी महा-मेट्रोचे व्यस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, HDFC बँकेचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष्य श्री. रजनीश प्रभू उपस्थित होते. (Ek Pune Card | Pune Metro)

“एक पुणे कार्ड” ची वैशिष्ठे पुढीलप्रमाणे:

महा मेट्रो पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रीपेड “मेट्रो कार्ड” ची सुविधा उपलब्ध करत आहे. यासाठी HDFC बँकेसोबत भागीदारी केली आहे. कार्डचे नाव “एक पुणे कार्ड” असे आहे आणि ते भारतीय पेमेंट (RuPay) योजनेवर आधारित आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, “एक पुणे कार्ड” नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या नियमांचे पालन करते.
“एक पुणे कार्ड” हे बहुउद्देशीय कार्ड आहे आणि ते मेट्रोच्या प्रवासाबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. “एक पुणे कार्ड” देशातील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या नियमांचे पालन करते. त्यामुळे भारतातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये वापरले जाऊ शकते. हे एक स्पर्श विरहित (कॉन्टॅक्टलेस) कार्ड आहे आणि त्यामुळे पेमेंट जलद होते. या कार्डद्वारे एकल व्यवहारासाठी ५००० रुपयांपर्यंत कोणत्याही पिनची आवश्यकता नाही. या कार्डद्वारे कोणतेही लहान-मोठे व्यवहार सहज करता येऊ शकतात. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे. प्रवासी पुणे मेट्रोच्या संकेत स्थळावर उपलब्ध ई-फॉर्म भरून “एक पुणे कार्ड” प्राप्त करू शकतात. “एक पुणे कार्ड” सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध आहे.
“एक पुणे कार्ड” दैनंदिन प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे आहे. कारण त्यांना तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवास सुरु करताना AFC गेटवर हे कार्ड टॅप केल्यावर गेट उघडून प्रवासी आपला प्रवास सुरु करू शकतात आणि स्टेशनमधून बाहेर पडताना बाहेर पडण्याच्या AFC गेटवर हे कार्ड टॅप केल्यावर प्रवासाच्या भाड्याइतके पैसे आपोआप कापले जातील. पालक आपल्या शाळा/कॉलेज जाणाऱ्या मुलांसाठी हे कार्ड घेऊ शकतात. सध्या पुणे मेट्रोतर्फे व”एक पुणे कार्ड” च्या सर्व धारकांना तिकिटातच्या किमतीत १०% सूट आहे.
पहिल्या ५००० प्रवाश्याना “एक पुणे कार्ड” हे मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत १५० + १८% कर अशी असेल.
——-
News Title | Ek Pune Card | Pune Metro | “Ek Pune Card”: Traveling by Pune Metro will be convenient