Katraj- Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला येणार वेग | काही जागामालक जागा ताब्यात देण्यास तयार

HomeBreaking Newsपुणे

Katraj- Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला येणार वेग | काही जागामालक जागा ताब्यात देण्यास तयार

Ganesh Kumar Mule Aug 08, 2023 1:41 PM

Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती 
Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता | 31 मे पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करा | वाहतूक नियंत्रणासाठी १२५ वॉर्डनची नियुक्ती करा
Katraj-Kondhwa Road Incident | आजी माजी आमदारामुळे कात्रज-कोंढवा रस्ता झाला मृत्यूचा सापळा! – प्रशांत जगताप

Katraj- Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला येणार वेग | काही जागामालक जागा ताब्यात देण्यास तयार

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला (Katraj-Kondhwa Road Land Acquisition) वेग येण्याची चिन्हे आहेत. रस्त्याच्या कामात बाधित होणारे काही नागरिक आता महापालिकेच्या ताब्यात जागा देण्यास तयार झाले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी नागरिकांनी तयारी दाखवली आहे. त्यानुसार आयुक्तांनी  देखील जागा ताब्यात घेऊन कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. (Katraj-  Kondhwa Road)
कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार  यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , नगरअभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, मालमत्ता विभागाचे प्रमुख  महेश पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर,  माजी नगरसेवक प्रकाश कदम , संगिता ठोसर, आदी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
पुणे शहराच्या मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये ८४ मी. रूंदीचा विकास योजना रस्ता ( कात्रज कोंढवा) दर्शविलेला आहे. सदर ८४ मी. रूंदी पैकी सरासरी २० मी. रूंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. उर्वरीत रूंदीसाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. सदर रस्त्यावरून मुंबई सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्डकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. सदरचा रस्ता विकसीत केल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल. (Pune Municipal Corporation)
 रस्त्याच्या विकसनासाठी सन २०१८ मध्ये निविदा मागविण्यात आलेल्या असून ३१.१०.२०१८ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. या कामासाठी रक्कम रूपये १९२ कोटी (जीएसटी वगळून) खर्च येणार आहे. टी.डी. आर. पोटी ताब्यात आलेल्या जागेवर रस्ता विकसनाचे काम झालेले आहे. तुकड्या तुकड्यामध्ये सुमारे ३० % रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादना अभावी रस्त्याचे काम खोळंबलेले आहे. टी. डी. आर. चे दर कमी झाल्यामुळे रस्तारूंदीतील जागेसाठी रस्तारूंदीतील जागा मालकांकडून जागेच्या बदली रोख रकमेची मागणी करण्यात येत आहे. (PMC Pune News)
८४ मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी अंदाजे रक्कम रूपये ५५६ कोटी खर्च अपेक्षित आहे. भू संपादन व रस्ता विकसनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे महापालिकेस अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत ५० मी. रूंदीचा रस्ता करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ५० मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २८० कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून 6 जुलै ला  विनंतीपत्र देण्यात आलेले होते. (Pune News)
पुणे महानगरपालिका हद्दीतील चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता महाराष्ट्र शासनाकडून १८५.४३ कोटी चा निधी मंजूर झालेला आहे व त्यानुसार काम सुरू आहे. प्रस्तुत कात्रज कोंढवा रस्ता मुंबई – सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्ड कडे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. यामुळे या भागातील वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता अनुदान प्राप्त झाले त्याच धर्तीवर कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्त्याचे काम प्राधान्याने करणेकरिता निधी मिळणेस विनंती आहे. या रस्त्याचे भूसंपादनाबाबत उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सोबत दिनांक १७/१०/२०२२ रोजी बैठकही झालेली आहे. तरी रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २०० कोटी निधी / अनुदान शासनाकडून सत्वर देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुरवणी मागणीत सरकारने 200 कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाला वेग येईल. असे म्हटले जात आहे.
—-
News Title | Katraj- Kondhwa Road | Speed ​​of land acquisition of Katraj-Kondhwa road Some landlords are willing to hand over the premises