PMC Fake Identity Card | बोगस ओळखपत्र बनवणारा ‘आयडी चौधरी’ पुणे महापालिकेचाच कर्मचारी!
PMC Fake Identity Card | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) लोगोचा (PMC Pune Logo) आणि नावाचा वापर करून बोगस ओळखपत्र (Bogus Identity card) तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ठेकेदार, त्यांचे कामगार, माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते, मानधनावर काम करणारे, लायझनिंग करणारे कर्मचारी अशा लोकांचा समावेश आहे. अशा प्रकारचे बोगस ओळखपत्र तयार करून देणारा हा महापालिकेचाच कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. ‘आयडी चौधरी’ या नावाने त्याला ओळखले जाते. हा उद्योग करून त्याने लाखो रुपये देखील कमावले आहेत. यावर महापालिका प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Fake Identity Card)
मागील आठवड्यपासून पुणे महापालिकेत (PMC Pune) ओळखपत्र तपासण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महापालिकेला असे 175 बोगस ओळखपत्र धारक सापडले आहेत. तूर्तास तरी सुरक्षा विभागाने (PMC Security Department) या लोकांना तंबी देऊन सोडले आहे. आगामी काळात मात्र अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सुरक्षा विभागाकडून देण्यात आला आहे. महापालिकेत वेगवेगळ्या कामासाठी नागरिक येत असतात. मात्र यातील काही लोक हे महापालिकेत पार्किंग करण्यासाठी, काही कारण नसताना येत असलेले आढळले आहे. यामुळे पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. तसेच हकनाक गर्दी दिसते. पुणे हे दहशतवाद्यांचे सॉफ्ट टार्गेट आहे हे नुकतेच काही प्रकरणावरून सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सुरक्षा विभागाने महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरु केली आहे. हे काम तृतीय पंथीयांना देण्यात आले आहे. ओळखपत्र दाखवल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामध्येच महापालिकेला बोगस ओळखपत्र मिळाले. महापालिकेच्या लोगोचा यासाठी वापर करण्यात येत आहे. ओळखपत्र आणि लेस चा वापर करून महापालिकेत प्रवेश मिळवला जात आहे. (Pune Municipal Corporation)
दरम्यान असे बोगस ओळखपत्र बनवणारी अशी कुठली कंपनी किंवा टोळी नसून एकच व्यक्ती असल्याचे समोर येत आहे. हा महापालिकेचाच कर्मचारी आहे. त्याला ‘आयडी चौधरी’ म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या ऑडिट विभागात हा कर्मचारी काम करतो. याची 2020 सालापासून म्हणजे कोरोना काळापासून सुरु आहे. कारण टाळेबंदीच्या काळात महापालिकेच्या कायम तसेच ठेका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर फिरण्यासाठी ओळखपत्र दाखवणे बंधनकारक केले होते. काही कर्मचाऱ्यांकडे आयडी च्या लेस नव्हत्या तर काही लोकांकडे आयडी नव्हते. मग हा कर्मचारी लेस बनवून देत असे. त्याचा दर 70-100 रु असा होता. आता हा दर 150-200 रुपयांपर्यंत गेला आहे. कोरोना काळात जवळसपास सर्वच कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यासाठी पैसे देखील खर्च केले आहेत. त्याचप्रमाणे ओळखपत्र बनवण्यासाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. ज्यावर विभागप्रमुख किंवा अधिकारीक व्यक्तीचा सही शिक्का आणण्यास सांगितला जातो. त्यानुसार ओळखपत्र बनवून दिले जाते. याचा लाभ सद्यस्थितीत ठेका तत्वावर, मानधनावर काम करणारे कर्मचारी, ठेकेदार, लायझनिंग करणारे लोक घेत आहेत. ही सगळी कामे हाच कर्मचारी करतो.
सध्या तरी महापालिका प्रशासनाने असे ओळखपत्र जप्त केले आहेत. मात्र हे बनवण्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Pune News)
———
News Title | PMC Fake Identity Card | ‘ID Chaudhary’ who made bogus identity card is an employee of the Pune Municipal Corporation!