PMC Health Service | माजी नगरसेविकेची आक्रमकता आणि सहायक आरोग्य अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने अखेर वरिष्ठ नागरिकाला मिळाला न्याय!
| शहरी गरीब योजनेत अजून सुधारणा आवश्यक | नागरिकांची अपेक्षा
PMC Health Service | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरी गरीब वैद्यकीय योजना (Urban poor Medical Assistance Scheme) राबवली जाते. ही योजना आता ऑनलाईन (Online) करण्यात आली आहे मात्र या योजनेतील काही तांत्रिक गोष्टीमुळे बालाजीनगरच्या वरिष्ठ नागरिकाला योजनेचे कार्ड घेण्यात अडचणी येत होत्या. यामध्ये भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका राणी भोसले (Ex corporator Rani Bhosale) यांनी पुढाकार घेतला. भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित नागरिकाला कार्ड देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. त्यानुसार सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (Assistant Health Officer Dr Manisha Naik) यांनी सगळी माहिती घेत आणि योजनेतील तरतुदीनुसार संबंधित नागरिकाला योजनेचे कार्ड दिले. असे असले तरी संबंधित नागरिकाला यात बराच काळ वाट पाहावी लागली. त्यामुळे योजनेत अजून सुधारणा कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. (PMC Health Service)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना (Urban Poor Medical Assistant Scheme) ही पुणे मनपा (PMC Pune) कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असलेल्या दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनिंगकार्ड व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Yearly income) १ लाख पर्यंत असणाऱ्या कुटूंबीयांना लागू करण्यात आलेली आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना सभासदत्व देण्यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करुन पूर्णपणे कार्यान्वीत करणेत येत आहे. त्यानुसार नागरिकांचे सभासदत्व रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन प्रोसेस, प्री-अॅथोरायझेशन, बिलींग प्रोसेस याबाबत कार्यवाही करणेत येत आहे. (PMC Health Department)
शुक्रवारी दुपारच्या सुमारास बालाजीनगर मधील एक रहिवासी या योजनेचे कार्ड काढण्यासाठी आले होते. मात्र शहरी गरीब योजनेच्या तरतुदी आणि नागरिकाचे रेशन कार्ड यात मेळ बसत नसल्याने संबंधित नागरिकाला अडचणी येत होत्या. याआधी देखील एकाच घरातील काही व्यक्ती दोन-तीन कार्ड घेत असल्याचा अनुभव महापालिकेच्या आरोग्य विभागाला होता. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभागाने सावध भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे संबंधित नागरिकाची देखील काही चूक नव्हती. कारण रेशन कार्डवरील आपल्या मुलाचे नाव कमी करण्याबाबत त्यांनी संबंधित कार्यालयाकडे अर्ज केला आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून हे पोर्टल बंद असल्याने ती प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे नागरिकाला नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे संबंधित नागरिकाने याबाबतची तक्रार माजी नगरसेविका राणी भोसले यांच्याकडे केली. तक्रार येताच भोसले तात्काळ मदतीला धावून आल्या. कार्ड जिथे दिले जातात तिथेच जाऊन भोसले यांनी याबाबतची चौकशी केली. तिथे त्यांचा आणि काही कर्मचाऱ्यांचा शाब्दिक वाद देखील झाला. मात्र नागरिकाला न्याय द्यायचाच या हेतूने भोसले यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. हे प्रकरण सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांच्या कानावर घातले. डॉ नाईक यांना देखील या प्रकरणाचे गांभीर्य कळले. त्यानुसार त्यांनी यात लक्ष घेतले. संबंधित नागरिकाच्या अर्जाची पूर्ण माहिती घेतली. योजनेचे कार्ड या नागरिकाला मिळू शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार नागरिकांकडून एक अर्ज घेतला गेला. आपल्या मुलाचे नाव रेशन कार्डवरून कमी करण्यास हरकत नाही, असे त्या अर्जात म्हटले. त्यानंतर नागरिकाला योजनेचे कार्ड देण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
—-
| नागरिकांच्या अपेक्षा
दरम्यान संबंधित नागरिकाला हे कार्ड मिळण्यात बराच अवधी लागला. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यात देखील बऱ्याच अडचणी येतात. यात लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच सूचना व्यवस्थित दिल्या जाव्यात, वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष असावा. एकूणच योजनेत अजून सुधारणा कराव्यात अशी मागणी नागरिकांनी या निमित्ताने केली आहे. (PMC Pune News)
—
| महापालिका कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा
शहरी गरीब योजनेचे कार्ड घेण्यावरून आरोग्य विभागातील कर्मचारी आणि नागरिक यांच्यात नेहमी हुज्जत झालेली पाहायला मिळते. यात शाब्दिक चकमक होते. नागरिकांसोबतच कर्मचारी देखील याला वैतागले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अपेक्षा केली आहे कि नागरिकांनी आमच्याशी सौजन्याने वागावे. आम्ही आमच्या वरिष्ठांचे आदेश पाळत असतो. आम्हांला देखील नागरिकांचे काम पूर्ण करावे वाटते. मात्र अधुरी माहिती आणि तांत्रिक गोष्टीमुळे उशीर होतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. (PMC Pune Health Service)
——
शहरी गरीब योजना नागरिकांसाठी निर्माण केली आहे. त्यामुळे योजना अजून नागरिकाभिमुख करणे आवश्यक आहे. नागरिकांना कळेल अशा सूचना द्यायला हव्यात. तसेच वरिष्ठ नागरिकांशी स्वतंत्र कक्ष करावा. जेणेकरून त्यांचे हाल न होता त्यांना लाभ मिळेल. तसेच कर्मचाऱ्यांनी देखील नागरिकांशी सौजन्याने वागणे अभिप्रेत आहे.
– राणी भोसले, माजी नगरसेविका.
—-
एकाच कुटुंबात शहरी गरीब योजनेचे जास्त कार्ड जाऊ नयेत म्हणून रेशन कार्डवर कुटुंबातील सर्वांची नावे असावीत असे बंधन केले आहे. कुटुंब विभक्त असेल तर नावे काढून टाकली गेलेली असायला हवीत. नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी.
– डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी.
—–
News Title | PMC Health Service | The aggression of the former councilor and the efforts of the assistant health officer finally got justice for the senior citizen!