PMC Pune Bharti 2023 | चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा पुणे महापालिकेचा पात्र उमेदवारांना इशारा | दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Bharti 2023 | चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा पुणे महापालिकेचा पात्र उमेदवारांना इशारा | दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये 

Ganesh Kumar Mule Jul 19, 2023 2:09 PM

Kasba Constituency | कसबा मतदार संघातील वाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी काँग्रेस ने महापालिका आयुक्ताकडे केली ही मागणी
Siddharth Nagar | PMC| सिद्धार्थ नगर मधील रहिवाशाना मिळणार पक्की घरे
Karve Road Pariking Update| कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वेमध्ये पार्किंगला परवानगी द्या!

PMC Pune Bharti 2023 | चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा पुणे महापालिकेचा पात्र उमेदवारांना इशारा

| भरतीबाबत महापालिका प्रशासनाकडून उमेदवारांना आवाहन

PMC Pune Bharti 2023 |  पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) 320 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. परीक्षेचे निकाल घोषित केल्यानंतर महापालिकेकडून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान यामध्ये उमेदवारांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडून देण्यात आला आहे. (PMC Pune Bharti 2023)

दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये

महापालिकेच्या आवाहनानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी (Pune Mahanagarpalika Bharti 2023) वेळोवेळी स्थानिक दैनिक वर्तमानपत्रांत सविस्तर जाहिरात देऊन तसेच महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येऊन कर्मचारी निवड समितीच्या अहवालानुसार पारदर्शकरीत्या पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. याद्वारे सर्व नागरिकांना/उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही मध्यस्थ/दलाल/परिचित/अपरिचित व्यक्तींशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरूपाची देवाण-घेवाण करू नये. अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी. (PMC Pune Recruitment 2023)

तसेच, याद्वारे सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, कागदपत्रे पडताळणीकामी अयोग्य अगर चुकीची कागदपत्रे सादर करू नयेत. अशी कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. (PMC Pune Bharti)
—–
News title | PMC Pune Bharti 2023 | Pune Municipal Corporation warns eligible candidates of criminal action if they submit wrong documents