PMC Retired Employees | सेवानिवृत्त झालेल्या सेवकांची सेवापुस्तके आवश्यक कागदपत्रांसह पाठवण्याचे आदेश   | मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे सर्व विभागांना आदेश

HomeBreaking Newsपुणे

PMC Retired Employees | सेवानिवृत्त झालेल्या सेवकांची सेवापुस्तके आवश्यक कागदपत्रांसह पाठवण्याचे आदेश | मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे सर्व विभागांना आदेश

Ganesh Kumar Mule Jul 18, 2023 3:40 PM

PMC : 7th pay commission : वेतन लवकर करण्यासाठी प्रशासनाची लगबग  : बिल लेखनिकांना शनिवार, रविवारी काम करण्याचे आदेश 
7th Pay Commission | Pune PMC News | 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा | वेतन प्रणालीचे जुने सॉफ्टवेअर आता बंद होणार!
DA Hike | डीए वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी |केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 4% महागाई भत्त्यात वाढ

PMC Retired Employees | सेवानिवृत्त झालेल्या सेवकांची सेवापुस्तके आवश्यक कागदपत्रांसह पाठवण्याचे आदेश

| मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे सर्व विभागांना आदेश

PMC Retired Employees | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) ०१/०१/२०१६ ते दि. ३१/१०/२०२१ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे (6th Pay Commission) पेन्शन अदा करणेत येत आहे. या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) तरतूदींप्रमाणे दुरूस्त करणे, त्यांना निवृत्तिवेतनातील, अंशराशीकरणातील तसेच तोषदानातील फरकाच्या रकमा लवकरात लवकर अदा आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Chief Audit Officer Ulka Kalaskar) यांनी सर्व खातेप्रमुखाना आदेश देत सेवापुस्तक आवश्यक कागदपत्रासह देण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Retired Employees)
 विविध खात्यांकडून जवळपास २१०० सेवानिवृत्त सेवकांची सेवापुस्तके मुख्य लेखा व वित्त विभागास प्राप्त झाली असून एकूण १६३५ प्रकरणांस मुख्य लेखापरिक्षक खात्याची मान्यता प्राप्त झाली आहे. तथापि, काही सेवापुस्तकांमध्ये सुधारीत दराने सरासरी वेतनाचा तक्ता नसणे, अंशराशीकरणाबाबतचे फॉर्म अ किंवा ब नसणे, आकारणी योग्य नसणे, शिल्लक रजेचे बील नसणे, यास्तव सेवापुस्तके तपासताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व वेतन बील लेखनिकांना सूचित करण्यात आले आहे की, या  सेवानिवृत्त सेवकांच्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्तिवेतन सुरू करणे व त्यानुषंगाने इतर लाभ देणे याकरीता मुख्य लेखा व वित्त विभागाकडे सेवापुस्तके पाठविताना खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. (Pune Municipal Corporation News)
१) निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरणाबाबत फॉर्म अ किंवा फॉर्म व प्रकरणी समाविष्ठ असल्याची खात्री करावी.
अंशराशीकरण करणेबाबतचे फॉर्म सेवकाने सादर केले नसल्यास अशा सेवकांकडून फॉर्म व भरून घेतलेला असावा अथवा त्यांस अंशराशीकरण करावयाचे नाही, अशा आशयाचे पत्र खात्याने सेवापुस्तकासोबत सादर करावे. तसेच अंशराशीकरण करणेबाबतचा फॉर्म अ नव्याने स्वीकारण्यात येऊ नये.
२) सुधारित दराने म्हणजेच सातव्या वेतन आयोगातील तरतूदीनुसार आकारणी केलेली असावी. सुधारित सरासरी वेतनाचा तपशिल इ. कागदपत्रे जोडावेत.
३) सुधारित वेतनानुसार ज्या सेवकांना शिल्लक हक्काच्या रजेच्या वेतनापोटी रक्कम देय असेल, त्यांस मूळ खात्यामार्फतफरकाची रक्कम अदा करणेत येईल. तथापि, याबाबत वसुली येत असल्यास सुधारित वेतनानुसार वसुली बील सोबत सादर करणे आवश्यक आहे.
४) उपरोक्तबाबत सर्व मा. खातेप्रमुख / महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी आपले अधिनिस्त वेतन बील लेखनिकांचाआढावा घेऊन उर्वरित प्रकरणे तात्काळ मुख्य लेखा व वित्त विभागास सादर करणेबाबत संबंधिताना आदेशित करावे. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Retired Employees | Order to send service books of retired servants along with necessary documents Orders of Chief Accounts and Finance Officers to all departments