Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे 

HomeBreaking Newsपुणे

Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे 

Ganesh Kumar Mule Jul 13, 2023 3:20 PM

Prithviraj Chavan | ‘फक्त पाच रुपयात श्री गणेशची मूर्ती’ उपक्रमाचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले उद्घाटन
Ganesh Idol Immersion | गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये | महापालिकेचे नियोजन तयार! 
PMC Ganesh Immersion | गणेशोत्सवात गेल्या ९ दिवसांत २ लाख ४ हजार ७४४ किलो जमा झाले निर्माल्य! | ४७ हजाराहून अधिक मूर्ती संकलित

Ganesh Utsav 2023 | पुणे महापालिकेकडून गणेश उत्सवाची तयारी सुरु | पर्यावरण गणेश उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे

Ganesh Utsav 2023 |पुणे  महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) गणेश उत्सव २०२३ (Ganesh Utsav 2023) ची तयारी सुरु करण्यात आली आहे.  प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) पासून बनविलेल्या गणेश मूर्तीवर बंदी असल्याने पीओपी (POP) गणेश मूर्ती (Ganesh Idol) खरेदी करू नये. तसेच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन (Environment Conservation) करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांनी १२ मे २०२० रोजी मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी  मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. महापालिका अतिररिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (PMC Additional Commissioner Dr Kumar Khemnar) यांच्याकडून सर्व नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव- २०२३ साजरा करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. (Ganesh Utsav 2023)

१) केवळ नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल जसे कि, पारंपारिक शाडू माती / चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करणे.  [ कोणताही विषारी अजैविक कच्चा माल तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी), प्लास्टिक आणि थरमाकोल (पॉलीस्टीरिन) यांचा वापर होणार नाही.]

२) मूर्तींचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर केला जाऊ शकतो.

३) मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पाणी आधारित रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा

[ विषारी आणि नॉन बायो डीग्रेडेबल (अविघटनशील) रासायनिक रंग / ऑईल पेंट्स, इनॅमल आणि कृत्रिम रंगावर आधारित पेंटसच्या वापर करण्यास सक्त मनाई आहे.

४) नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावे. रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा.

[ विषारी रसायने असलेली डिसपोजेबल साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.]

 

सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते कि, उपरोक्त मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करणारे गणेश मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांचेकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

———-

News Title | Ganesh Utsav 2023 | Preparations for Ganesh Utsav have started from Pune Municipal Corporation Guidelines for Environmental Ganesh Utsav