Pune City Traffic Update | सह्याद्री लेन ते बदामी चौक दरम्यानची जड वाहतूक बंद होणार

HomeBreaking Newsपुणे

Pune City Traffic Update | सह्याद्री लेन ते बदामी चौक दरम्यानची जड वाहतूक बंद होणार

Ganesh Kumar Mule Jul 11, 2023 5:03 AM

MHADA | म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!
Pune Water Cut | पुणेकरांना रोज पाणी मिळेल याची व्यवस्था करा | माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची मागणी
Senior Citizens Health | शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी पूर्ववत करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आयुक्‍तांना निवेदन

Pune City Traffic Update | सह्याद्री लेन ते बदामी चौक दरम्यानची जड वाहतूक बंद होणार

 | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

| वाहतूक बंद करण्याबाबत पुणे वाहतूक शाखेचा निर्णय

Pune City Traffic Update | शास्त्रीनगर, सह्याद्री हॉस्पीटल समोरून शांतीरक्षक मार्गे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथून बदामी चौकाकडे जड वाहनांची होणारी वाहतूक बंद (Heavy Vehicles Traffic) करण्यात येणार आहे. त्या बाबत पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी पुणे वाहतूक शाखेला (Pune City Traffic Police) निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. संबंधीत मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात येणार असून त्या बाबत नागरिकांच्या सूचना पाहून त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त विजयकुमार मगर (Deputy Police Commissioner Vijaykumar Magar) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले आहे. (Pune City Traffic Update)
येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातील (Shastrinagar Chowk Yerwada) सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) लेन येथून बदामी चौक (Badami Chowk), जुना एअरपोर्ट रस्ता (Old Airport Road) येथे जाणारी व एअरपोर्ट रोडवरील (Airport Road m) बदामी चौकीतून सह्याद्री हॉस्पिटल च्या रस्त्याने नगर रोड कडे जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी करण्याचा निर्णय वाहतूक शाखेचे पोलीस उपयुक्त विजय मगर यांनी सोमवारी घेतला आहे. सह्याद्री हॉस्पिटल मार्गे बदाम चौकाकडे जाताना अरुंद रस्त्यामुळे होणारे वाहतूक कोंडी तसेच सातत्याने होणारे अपघात यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी मागील दोन महिन्यांपासून या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. कालच कॉमर्स झोन जवळील मेंटल हॉस्पिटलच्या समोर अज्ञात जड वाहनाने चिरडल्यामुळे एका स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या सर्व गंभीर परिस्थितीची तात्काळ माहिती घेऊन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी आज सोमवारी (दि. 10) हा निर्णय घेतला आहे. (Pune Traffic Update)
या भागातील जड वाहतूक बंद केल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून शास्त्रीनगर चौक येथून सरळ गोष्ट चौकातून उजवीकडे वळून एअरपोर्ट रोडने बदामी चौकातून वाहनांना पुढे जाता येईल तसेच बदामी चौकाकडून सरळ गोल क्‍लब चौकाच्या डावीकडे वळून शास्त्रीनगर चौकातून नगर रस्त्याने या वाहनांना पुढे जाता येणार आहे. पुणे शहर वाहतूक शाखेने घेतलेले या निर्णयाचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी स्वागत केले आहे.

|  वाहतूक शाखेचा आदेश

शास्त्रीनगर चौकातील सह्याद्री हॉस्पीटल लेन येथुन बदामी चौक, जुना एअर पोर्ट रोड येथे जाणारी व एअरपोर्ट रोडवरील बदामी चौक येथून सह्याद्री हॉस्पीटल लेन मार्गे नगर रोडकडे जाणाऱ्या जड वाहनांचे वाहतूकीस बंदी करण्यात येत आहे.त्या ऐवजी शास्त्रीनगर चौक सरळ गोल्फ चौक, उजवीकडे वळुन एअरपोर्ट रोडने बदामी चौक पुढे इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच बदामी चौक सरळ गोल्फ क्‍लब चौक डावीकडे वळण घेवुनशास्त्री नगर चौक पुढे इच्छितस्थळी जाता येणार आहे. 10 ते 25 जुलै पर्यंत लेखी स्वरूपात नागरीकांच्या सूचना व हरकतींचा विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले. (Pune City Traffic Police)
——
या भागातील गंभीर अशी वाहतूक कोंडी व सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी जड वाहनांची वाहतूक बंद करणे आवश्‍यक होते. त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्याची दखल वाहतूक शाखेने घेतली त्याचे मी स्वागत करतो.  नागरिकांनी कायम स्वरुपी जड वाहतुक बंद करावी, या करिता वाहतूक शाखेला सूचना कराव्यात असे या निमित्त मी आवाहन करत आहे.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.
———-
News Title | Pune City Traffic Update |  Heavy traffic between Sahyadri Lane and Badami Chowk will be closed  |   Success in pursuit of Dr. Siddharth Dhende