PMC Health Department | कीटकजन्य आजारांबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती
PMC Health Department | पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) कीटक प्रतिबंधक विभागाकडून शहरात ठिकठिकाणी कीटकजन्य आजारांबाबत (Insect Borne Diseases) जनजागृती करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर (PMC Ward Offices) हे काम केले जात असून नागरिकांनी पावसाळ्यात आरोग्याकडे लक्ष द्यावे, यासाठी हे काम केले जात आहे. अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Assistant Health Officer Dr Suryakant Devkar) यांनी दिली. (PMC Health Department)
पावसाळ्याच्या दिवसांत शहरात कीटकजन्य आजार डोके वर काढतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुनिया या कीटकजन्य आजाराचा समावेश असतो. मागील काही वर्षांपासून डेंगू शहरात थैमान घालत आहे. यावर्षी अजून जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी शहरात कीटकजन्य आजार दिसून येत नाहीत. यामुळे महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाकडून आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती अभियानांतर्गत पत्रके वाटण्यात येत आहेत. ठिकठिकाणी स्टिकर्स चिकटवण्यात येत आहेत. तसेच बॅनर्स लावण्यात आले आहेत. शहरातील शाळा, सोसायट्या तसेच सर्वच सार्वजनिक ठिकाणी असे बॅनर्स लावण्यात येत आहेत. असे डॉ देवकर यांनी सांगितले. (Pune Insect Borne Diseases)
—
News Title | Public awareness by Health Department of Pune Municipal Corporation regarding insect borne diseases