वारजे माळवाडी मधील कै अरविंद बारटक्के दवाखान्यात लवकरच डायलेसिस सेंटर
विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची माहिती
पुणे: वारजे माळवाडी मधील पुणे महानगर पालिकेच्या कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात डायलेसीस सेंटर, एक्सरे व सोनोग्राफी ची सुविधा लवकरच सुरू करीत आहोत. यामध्ये दहा डायलेसीस बेड्स ची व्यवस्था करीत आहोत. या सुविधे मुळे वारजे; कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, कोंढवा कोपरे -धावडे तसेच कोथरूड व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय नियमानुसार अतिशय कमी शुल्क आकारून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. अशी माहिती विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली.
: नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हा उद्देश
धुमाळ यांनी सांगितले कि, त्याचबरोबर एक्सरे व सोनोग्राफी ची सुध्दा व्यवस्था करीत आहोत. या डायलेसीस सेंटर चे लोकार्पण सोहळा लवकरच करीत आहोत की जेणे करून नागरिकांना पुणे शहरात लांबच्या ठिकाणी अथवा खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात शुल्क देऊन जावे लागणार नाही. या उपक्रमा मुळे सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना या केंद्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर याच दवाखान्यात महानगर पालिकेच्या माध्यमातून सिटी स्कॅन मशिन ची व्यवस्था करीत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने माझ्या सारख्या सर्वसामान्य नगरसेविकेला विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी देऊन एक विश्वास व्यक्त करून मोठा जबाबदारी दिली त्यानुसार माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्या प्रभागातील व परिसरातील नागरिकांना त्यांना त्यांच्या आरोग्यावर चांगले उपचार व्हावेत व सर्व सुविधा उपलब्ध व्हावेत याच उद्देशाने ये दवाखान्यात डायलेसीस बेड्स, एक्सरे; सोनोग्राफी केंद्र सुरू करित आहोत. सदर उपक्रमा साठी राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींच्या सहकार्याने व पुणे महानगर पालिकेने भरीव निधी उपलब्ध करून दिली आहे. अशी माहिती दिपाली धुमाळ यांनी दिली.
COMMENTS