PMC Employees Yoga Meditation | पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी उद्या योग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन
आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात महापालिका कर्मचाऱ्यांना ध्यानाचे (Meditation) महत्व समजून सांगण्यासाठी सहजयोग ध्यान व प्रशिक्षण केंद्र मार्फत पुणे महानगरपालिका अधिकारी/ कर्मचारी (PMC Pune Employees and officers) यांचेकरिता योग ध्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात रोजच्या जीवनात मनावर, शरीरावर, विचारांवर ध्यानामुळे होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम पुणे महानगरपालिका मुख्य इमारत येथील विशेष समिती सभागृह येथे ३ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६.०० या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांना सोयीनुसार फक्त १५ मिनिटे उपस्थित राहून योग ध्यान कार्यक्रमाचा लाभ घ्यावयाचा आहे. तसेच सदर कार्यक्रम हा ऐच्छिक स्वरूपाचा आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation)