Aashadhi Ekadashi | Shivsena Pune | आषाढी एकादशीच्या दिवशी पुणे शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावेत

HomeBreaking Newsपुणे

Aashadhi Ekadashi | Shivsena Pune | आषाढी एकादशीच्या दिवशी पुणे शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावेत

Ganesh Kumar Mule Jun 26, 2023 1:22 PM

Aashadhi Yatra Palkhi Sohala | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा
Pandharpur Wari| अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वारकरी सेवेची २९ वर्षे!
Pandharpur Aashadhi wari | पंढरपुरकडे पायी निघालेल्या लाखो महिला वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य वारी’

Aashadhi Ekadashi | Shivsena Pune | आषाढी एकादशीच्या दिवशी पुणे शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावेत

| शहर शिवसेनेची पोलिस आयुक्तांकडे मागणी

Aashadhi Ekadashi | Shivsena Pune | पुणे शहरातील (Pune City) सर्व कत्तलखाने (Slaughterhouses) आषाढी एकादशीच्या (Aashadhi Ekadashi) महोत्सवाच्या निमित्ताने आपण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांच्याकडे शहर शिवसेनेकडून (Pune Shivsena) करण्यात आली आहे. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (President Pramod (Nana) Bhangire) यांनी दिली. (Aashadhi Ekadashi | Shivsena Pune)
शहर शिवसेनेकडून पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन  देण्यात आले आहे. यावेळी शहर अध्यक्ष भानगिरे यांच्यासह सहसंपर्क प्रमुख अजय भोसले (Ajay Bhosale), जिल्हा प्रमुख उल्हास तुपे (Ulhasnagar Tupe) उपस्थित होते. शिवसेनेच्या निवेदनानुसार महाराष्ट्रातील  समस्त वैष्णवांचा मेळा म्हणून मानल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त पुणे शहरात शहरातील समस्त वारकरी संप्रदाय व नागरिक आषाढी एकादशीच्या दिवशी उत्साहाने, भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होतात. या दिवशी समस्त महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायाची मनोभावे पूजाअर्चा केल्या जाते. या दिवशी पुणे शहरात सुरू असलेले कत्तलखाणे हे बंद करून समस्त वारकऱ्यांच्या भावनांना ठेच लागू नये. तसेच या दिवशी कोणत्याही ठिकाणी पशु हत्या होवू, नये याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.  त्यामुळे पुणे शहरातील सर्व कत्तलखाने आषाढी एकादशीच्या महोत्सवाच्या निमित्ताने आपण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. (Pune News) 

—-
News Title | Aashadhi Ekadashi |  Shivsena Pune |  All slaughterhouses in Pune city should be closed on Ashadhi Ekadashi