Eid-ul-Zuha | बुधवारच्या ऐवजी आता गुरुवारी सुट्टी!   | राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

HomeBreaking Newssocial

Eid-ul-Zuha | बुधवारच्या ऐवजी आता गुरुवारी सुट्टी! | राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

Ganesh Kumar Mule Jun 26, 2023 12:39 PM

Chandni Chowk | चांदणी चौकातील जुना पूल पडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात
PMRDA | ‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली | १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
Education Dept | PMC | शिक्षण विभागाचे समायोजन करण्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी | 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांसमोर

Eid-ul-Zuha | बुधवारच्या ऐवजी आता गुरुवारी सुट्टी!

| राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

Eid-ul-Zuha | बकरी ईद (ईद उल झुआ) (Eid-ul-Zuha) या सणानिमित्त जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या (Public Holiday) दिनांकात बदल करण्यात आला आहे. ही सुट्टी 28 जून म्हणजे बुधवारी दर्शवण्यात आली होती. मात्र सण 29 ला म्हणजे गुरुवारी येत असल्याने सार्वजनिक सुट्टी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Eid-ul-Zuha)

शासनाने सन २०२३ करीता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील बकरी ईद (Bakraid) ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, २८.०६.२०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र हा  सण गुरुवार, २९.०६.२०२३ रोजी येत असल्याने २८.०६.२०२३ रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, २९.०६.२०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. (Public Holiday)

 

—-
News Title | Eid-ul-Zuha |  Holiday on Thursday instead of Wednesday!  |  Notification issued by the State Govt