Marathwada Muktisangram | मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

HomeBreaking Newssocial

Marathwada Muktisangram | मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

Ganesh Kumar Mule Jun 22, 2023 4:50 AM

Marathwada Janvikas Sangh | Diwali | मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला, कष्टकरी, निराधार मुलांना पोशाख व मिठाई वाटप करून दिवाळी साजरी
Bandara Dongar | काल्याच्या महाप्रसादाने भंडारा डोंगरावरील अखंड गाथा पारायण सोहळ्याची सांगता
bhandara Dongar Trust | भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन

Marathwada Muktisangram | मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव यंदा विविध उपक्रमांनी साजरा होणार

| मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Marathwada Muktisangram | यंदा मराठवाडा मुक्तीसंग्रामास (Marathwada Muktisangram) 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा आणि शासकीय कार्यालयात 75 हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत, अशी माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे (Dharashiv Collector Dr Sachin Ombase) यांनी दिली. (Marathwada Muktisangram)
             स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण, उपशिक्षणाधिकारी रत्नमाला गायकवाड, पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम. गोदभरले, जिल्हा माहिती अधिकारी यासीरुद्दीन काझी, स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगावकर, बुबासाहेब जाधव, विवेक भोसले मुरलीधर होनाळकर, भाऊसाहेब उमाटे, डॉ. सतीश कदम, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते. (Marathwada Muktisangram Din)
            यानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, मॅरेथॉन स्पर्धा, सायकल रॅली, प्रभात फेरी, तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित व स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तिका तयार करण्यात येणार आहेत. 75 हजार रोपांचे वृक्षारोपण व जिल्ह्यातील 75 हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (Marathwada Muktisangram Divas)
            याबरोबरच मौजे हिप्परगा येथील शाळेतील स्मारकाभोवती संरक्षक भिंत उभी करणे, मौजे इट येथे कार्यक्रम घेणे, तुळजापूर येथे शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करणे. नळदुर्ग, गुंजोटी,देवधानोरा, मराठवाडा मुक्तीसंग्रामात शहिद झालेले आपसिंगा येथील हुतात्मा श्रीधर वर्तक यांची 5 जुलै रोजी जयंती साजरी करणे, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची घरी जाऊन आरोग्य तपासणी करणे, उस्मानाबाद येथे विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करणे, मौजे चिलवडी येथे स्मृतीस्तंभ उभारणे, 17 सप्टेंबर रोजी सर्व गावांमध्ये दीपोत्सव साजरा करणे, तसेच मराठवाड्यातील जी 52 गावे सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट आहेत, त्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन करणे आदी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
——
News Title | Marathwada Muktisangram |  The Amrit Mahotsav of Marathwada Liberation War will be celebrated this year with various activities