PMC Pune Employees Union | पुणे मनपातील कर्मचारी संघटना ठराविक सेवकासाठीच काम करत असल्याचा आरोप  | महापालिका कर्मचारी दुसरा महासंघ स्थापण्याच्या तयारीत 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Employees Union | पुणे मनपातील कर्मचारी संघटना ठराविक सेवकासाठीच काम करत असल्याचा आरोप  | महापालिका कर्मचारी दुसरा महासंघ स्थापण्याच्या तयारीत 

Ganesh Kumar Mule Jun 17, 2023 1:04 PM

PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करण्याचा मोह सुटेना | 5-6 वर्ष खात्यात काम करूनही पुन्हा टॅक्स विभागात येण्याची आस
Pune Helmet Day | PMC Pune | पुणे महापालिकेच्या 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई | उद्याही  कारवाई मात्र ती तीव्र असणार! 
PMC Pay Roll and Pension Software | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | नवीन वर्षांपासून 1 तारखेलाच मिळणार वेतन!

PMC Pune Employees Union | पुणे मनपातील कर्मचारी संघटना ठराविक सेवकासाठीच काम करत असल्याचा आरोप  | महापालिका कर्मचारी दुसरा महासंघ स्थापण्याच्या तयारीत

PMC Pune Employees Union | पुणे महापालिकेत कर्मचाऱ्यांचे (Pune Municipal Corporation Employees) प्रश्न सोडवण्यासाठी बऱ्याच संघटना अस्तित्वात आहेत. मात्र या संघटना सेवकांचे प्रश्न सोडवण्याबाबत असमर्थ आहेत. शिवाय या संघटना ठराविक सेवकासाठीच काम करतात, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी महापालिकेत (PMC Pune) दुसरा कर्मचारी महासंघ स्थापन करण्याच्या देखील हालचाली सुरु केल्या आहेत.  (PMC Pune Employees Union)

पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकारिणीची लोकशाही पद्धतीने निवड करा

लेखनिकी संवर्गातील विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियन या संघटनेची स्थापना करण्यात आली. कॉ. आप्पासाहेब भोसले, कॉ. पांडुरंग सावंत अशा कामगार नेत्यांच्या
विचारांनी प्रेरित होऊन युनियनने आज पर्यंत विविध प्रश्न मार्गी लावले. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये सेवकांची रखडलेली बढती, बदल्या, वेतन श्रेणी, पदनिश्चिती तसेच इतरही अनेक प्रश्न मार्गी न लागल्यामुळे अनेक सेवक हवालदिल झाले आहेत. पी. एम. सी. एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकारीणी विषयी बहुतांशी सेवकांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांच्या कार्यपद्धतीवर संभ्रम निर्माण झाल्याने अनेक सेवकांनी खालीलप्रमाणे प्रश्न उपस्थित केले आहेत. (Pune Municipal Corporation Unions)

१. सेवकांच्या प्रश्नाविषयी आवाज न उठवणे, ते वेळेवर न सोडविणे.
२. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सेवकांचे प्रश्न मांडताना भेदभाव करून मवाळ भूमिका घेणे.
३. लेखनिकी संवर्गातील नवीन सेवकांना युनियन कार्यकारीणी मध्ये पुरेस प्रतिनिधित्व न देणे.
४. नवीन सेवकांचे प्रश्न समस्या याविषयी चर्चा न करणे, त्यांना विश्वासात न घेणे.

वरीलप्रमाणे अशा अनेक बाबींमुळे सेवकांमध्ये युनियन कार्यकारीणी बद्दल नाराजी असून सध्या अस्तित्वात असलेली कार्यकारिणी बरखास्त करून लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन नविन कार्यकारीणी पुनर्स्थापित करावी अशी बहुतांशी सेवकांची आग्रहाची मागणी आहे. अन्यथा आम्ही सर्व सेवक पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियनचे सभासदत्व रद्द करून पर्यायी संघटना स्थापना करण्याच्या मानसिकतेमध्ये असून, तसे झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. (PMC Pune Employees News)

तरी, विद्यमान कार्यकारिणीने आपल्या जबाबदारी व कर्तव्याचे भान राखून हे पत्र मिळताच त्वरीत पुढील आठ दिवसात कार्यकारिणी बरखास्त करावी आणि लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरे जावे. जेणेकरून सेवकांमधून मतदान प्रक्रियेतून निवडून आलेले नवनिर्वाचित पदाधिकारी आपली कर्तव्य व जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडू शकतील. (Pune Municipal Corporation)

कर्मचारी संघटना  अस्तित्वात येऊन ८० वर्ष झाले  परंतु सेवकांच्या खालील समस्या प्राधान्याने सोडवल्या  जात नाही.

१) संघटनेची घटना नियमावली सर्व सेवकांना उपलब्ध होत नाही.

२) संघटने मध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका का घेतल्या जात नाहीत.

​३) आपण नेमलेल्या भातृ संघटना कोणत्या नियमद्वारे अस्तित्वात आहेत.

४) सेवकांना संघटनेचे सभासद नंबर का दिले नाहीत. वर्गणीच्यापावत्या दिल्या जात नाही.

५) सेवकांसाठी मुख्य इमारतीमध्ये मध्ये उपहारगृह नाही.

६) सेवकांसाठी मुख्य इमारतीमध्ये युनियन कार्यालय नाही.

७) सेवकांचे बदली धोरण असतांना, जवळ जवळ ७ – ८ वर्षापासून त्याची अमलबजावणी होत नाही. तसेच वरिष्ठ लिपिक पदोन्नती करणेबाबत उदासीनता दिसून येत आहे.

८) बायोमेट्रिक हजेरी करण्याची सक्ती प्रशासनाने केली आहे परंतुतशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.

​९) महाराष्ट्र शासनाने निर्णय पारित केल्यानंतरही पदोन्नती शिडी कमी करणे बाबत पुणे मनपाचा प्रस्ताव अद्याप  सादर करण्यात आलेला नाही. (सदर बाबत सर्व सेवकांशी कोणतीही चर्चा केलेली दिसून येत नाही.)

१०) जुनी पेन्शन योजना लागू कारणे बाबत आपण शासन स्तरावर काय  भूमिका घेतली.

११) सेवकांना विचारात न घेता त्यांचे पैसे NPS मध्ये वर्ग केले जाऊ नयेत.

१२) शासन नियमानुसार दरवर्षी पदांचा आढावा घेणे असा आदेशअसून देखील गेली ३ वर्ष मनपाच्या सर्व पदोन्नतीमध्ये प्रशासन काही ना काही कारणे देत आहे. कित्येक DPC बैठकविना पार पाडत आहेत. प्रशासन कोणताही ठाम निर्णय घेताना दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या असून गेली कित्येक दिवस काहीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही व त्याबद्दल काही संवाद देखील होत नाही. (PMC Pune News)


News Title |PMC Pune Employees Union | Allegation that Pune municipal employee union is working only for a certain servant Municipal employees preparing to form another federation