Pune Akashwani Centre Update| चुकीच्या निर्णयाला स्थगिती नको, कायमस्वरूपी अधिकारी नेमा | काँग्रेसच्या मागणीला यश | मोहन जोशी

HomeपुणेBreaking News

Pune Akashwani Centre Update| चुकीच्या निर्णयाला स्थगिती नको, कायमस्वरूपी अधिकारी नेमा | काँग्रेसच्या मागणीला यश | मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Jun 15, 2023 1:39 PM

PMC election : Nana patole : पुणे महापालिकेवर पूर्वीप्रमाणे काँग्रेसचा झेंडा फडकवा : नाना पटोले
Soniya Gandhi | Rahul Gandhi | भाजपच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही
PM Modi Attack on congress : काँग्रेसच्या काळात फक्त भूमीपूजन; पण प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे

Pune Akashwani Centre Update| चुकीच्या निर्णयाला स्थगिती नको, कायमस्वरूपी अधिकारी नेमा | काँग्रेसच्या मागणीला यश | मोहन जोशी

Pune Akashwani Centre Update | पुणे आकाशवाणी केंद्राचे (Pune Akashwani Centre) वृत्त विभाग केंद्र बंद करण्याच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर (Union Minster Anurag Thakur) यांनी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परंतु पुणेकर जनतेचा असलेला रोष व काँग्रेसने (Congress party) केलेली मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनी (Central Government) केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पुणेकरांना स्थगिती नको निर्णय कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. अशी काँग्रेसची मागणी आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी म्हंटले आहे. (Pune Akashwani Centre Update)

मोहन जोशी पुढे म्हणाले की, यासाठी केवळ सक्षम माहिती अधिकारी नाही असे कारण सांगून हे केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. मात्र हे कारण पुन्हा मिळू नये, त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय माहिती सेवेतील सक्षम अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी म्हणजे पुणे आकाशवाणी केंद्राचे वृत्तसेवा केंद्र बंद होण्याचा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही. तसेच पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने मार्गी लागण्यासाठी हाती घेतल्यावर पुणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठींब्या बद्दल पुणेकरांचेही आभार मानतो, असे मोहन जोशी शेवटी म्हणाले. (Pune Akashwani news)


News Title | Pune Akashwani Center Update| Don’t suspend wrong decisions, appoint permanent officers Success to Congress demand Mohan Joshi