PMPML | 7th Pay Commission | पीएमपी कर्मचाऱ्यांना जुलै पासून 100% सातवा वेतन आयोग लागू होणार

HomeBreaking Newsपुणे

PMPML | 7th Pay Commission | पीएमपी कर्मचाऱ्यांना जुलै पासून 100% सातवा वेतन आयोग लागू होणार

Ganesh Kumar Mule Jun 15, 2023 9:57 AM

Smart City pune | डबल डेकर बस सुरु करण्याची तयारी पूर्ण करा
Alandi | DP | आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार | पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Canal Advisory Committee | पुण्यात पाणीकपात लागू होणार का? आज होणार निर्णय  | दुपारी कालवा समितीची बैठक

PMPML | 7th Pay Commission | पीएमपी कर्मचाऱ्यांना जुलै पासून 100% सातवा वेतन आयोग लागू होणार

| पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

PMPML | 7th Pay Commission | पीएमपीएलच्या (PMPML Employees) 10 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अजूनही पूर्णपणे सातव्या वेतनआयोगाचा (7th Pay Commission) लाभ देण्यात आलेला नव्हता. मागील वर्षी त्यांना 50% सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. मात्र 100% आयोग लागू करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे टीका कर्मचारी संघटनेनी केली होती. यावर आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी पीएमपी प्रशासनासोबत बैठक घेत जुलै पासून 100% वेतन आयोग लागू करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (PMPML| 7th Pay Commission)
गेल्या दोन वर्षापासून १०० टक्के सातवा वेतन आयोग पीएमपीएमएल कर्मचा-यांना लागू करण्यात आलेला नव्हता. दोन्ही महानगर पालीकेच्या स्वामित्वाची रक्कम मार्च २०२२–२३ च्या अर्थसंकल्पात सुध्दा लागू करण्यासाठी लागणारी रक्कम व फरकाची रक्कम याची तरतुद करण्यात आलेली आहे. परंतु दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त यांनी व सध्याचे प्रशासक यांनी  रक्कम परिवहन महामंडळाला दिलेली नसल्याने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी न झाल्याने सर्व कामगारामध्ये मोठया प्रमाणात जनक्षोभ वाढलेला होता. त्यामुळे प्रशासनावर कामगारांची विश्वासार्हता राहिलेली नाही. असा आरोप संघटना करत होत्या. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षापुर्वीच सतवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून फरक सुध्दा देण्यात आलेला आहे. तसेच पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२१ पेड इन जानेवारी २०२२ च्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून माहे मार्च २०२२ पेड इन एप्रिल २०२२ मध्ये फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. मागील वर्षी पीएमपी कर्मचाऱ्यांना 50% आयोग लागू केला होता. (PMPML Pune)
मात्र पूर्ण आयोग लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपी प्रशासन आणि कर्मचारी संघटनांसोबत गुरुवारी बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% वेतन आयोग जुलै महिन्यापासून लागू होईल. (PMPML Pune News) 
News Title | PMPML | 7th Pay Commission | 100% Seventh Pay Commission will be applicable to PMP employees from July