PMC Pune RFD project | नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पुणे महापालिकेकडून रोपांची लागवड 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune RFD project | नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पुणे महापालिकेकडून रोपांची लागवड 

Ganesh Kumar Mule Jun 05, 2023 3:23 PM

Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 
PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा ठरल्या  | जाणून घ्या सविस्तर!
Pune city is now 5 stars! |Another honour in the veins of (PMC)

PMC Pune RFD project | नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पुणे महापालिकेकडून रोपांची लागवड

PMC Pune RFD project | जागतिक पर्यावरण दिनाचे (World Environment Day) औचित्य साधून ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) वृक्ष रोपणाच्या (Tree plantation) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शादलबाबा दर्गा ते गणेश घाट या दरम्यान रे १० ते १५ फुट उंचीची रोपे लावण्यात आली आहेत. यापूर्वी देखील पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC Pune) स्वदेशी ५० रोपांची लागवड जानेवारी २०२३ दरम्यानच्या काळात करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) देण्यात आली.
या कार्यक्रमाकरिता अतिरिक्त महापालिका आयुक्त   विकास ढाकणे व अधिक्षक अभियंता युवराज देशमुख व वृक्ष प्राधिकरण अधिक्षक  अशोक घोरपडे व इतर अधिकारी कर्मचारी इ.उपस्थित होते.

नदी सुधारणा प्रकल्प (River front Devlopment project) अंतर्गत शादलबाबा दर्गा ते गणेश घाट या दरम्यान ३०० मी. नदीकाठ सुधारणेच्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या नदीकाठ सुधारणेमध्ये वृक्षारोपणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर प्रकल्पा अंतर्गत सुमारे ६९,००० रोपांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. स्ट्रेच ९ मध्ये १५३४ झाडे सुभाबूळ, कुभाबूळ, व काटेरीबाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील आहेत. स्ट्रेच १० व ११ मध्ये सुमारे १२५३ झाडे सुभाबूळ,कुभाबूळ, व काटेरीबाभूळ, विलायती चिंच प्रजातीमधील आहेत. ही झाडे काढून सदर ठिकाणी विदेशी प्रजाती ऐवजी स्वदेशी रोपे लावण्यात येणार आहेत. (Pune Municipal Corporation RFD project)

नवीन लागवड करण्यात येणाऱ्या झाडांची नावे पुढील प्रमाणे :-

* करंज, मेढसिंगी, कांचन, कदंम्ब, साग, मुचकुंद, रक्तरोहिडा, पिंपळ, कैलासपती, बकुळ, काळाकुडा, पानजांभूळ इ. फुले येणारी झाडे.
* आंबा, जांभूळ, गुलार, पुत्रवंति, भोकर, खिरणी, अर्जुन, आसन, चिरंजी इ. फळझाडे जी पक्षांसाठी उपयोगी आहेत.
* घोळ, अर्जुन, आंबा, खिरणी इ. पक्षांना घरटी बांधण्यासाठी उपयुक्त अशी झाडे.
* लिंब, कदम्ब, जांभूळ, आंबा, वड इ. मोठी झाडे सावलीसाठी.
—-
News Title | PMC Pune RFD project | Plantation of saplings by Pune Municipal Corporation under River Improvement Project