Pune Municipal Corporation | भाडे तत्वावर पथारी देणाऱ्या फेरीवाल्यांची खैर नाही! येत्या शनिवार पर्यंत चालवली जाणार मोहीम
Pune Municipal Corporation | शहरात व्यवसाय करत असताना आपली पथारी भाडे तत्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे. नियम डावलून पथारी धारक (Hawker’s) अशा पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने (PMC encroachment Department) अशा पथारीधारकावर गंभीरपणे कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अशा पथारी धारकांवर तीव्र कारवाई सुरु करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या पथारी धारकाचा परवाना (License) रद्द करण्यात येणार आहे. येत्या शनिवार पर्यंत ही मोहीम चालवली जाणार आहे. अतिक्रमण विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (Pune Municipal Corporation)
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (PMC Pune encroachment Department) शहरातील फेरीवाल्यांना (Hawker’s) व्यवसाय करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. अधिकृत व्यवसायिकांना सर्टिफिकेट (certificate) देखील देण्यात आले आहे. मात्र हे फेरीवाले आपले दुकान भाडे तत्वावर चालवण्यास देत आहेत. ही गोष्ट नियमबाह्य आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. असे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. (PMC Pune Marathi News)
| अतिक्रमण निरीक्षक यांच्यावर ठपका
पुणे शहरातील रस्ता पद पथांवर मान्य हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन झालेल्या अथवा झिरो झोन कन्सेप्ट अन्वये व्यवसाय करत असलेल्या नोंदणीकृत पथ विक्रेत्यांपैकी बरेचसे व्यवसयिक स्वतः व्यवसाय न करता त्यांचा परवाना अनधिकृतपणे इतरांना मासिक/दैनिक भाड्याने अथवा कामगार ठेऊन व्यवसाय करत असल्याचे वारंवार आढळून येत असल्याचे त्या बाबत नागरिकांच्या तसेच लोकप्रतीनिधींच्या तक्रारी देखील येत आहेत. ही बाब गंभीर असून क्षेत्रिय कार्यालयाकडे प्रभाग निहाय नेमणुकीस असलेल्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक यांचे कडून याबाबत योग्य ती दखल घेतली जात नसल्याचे वारंवार आढळून येत आहे. (Pune Municipal Corporation News)
त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे नियंत्रणाखाली अशा स्वतःचे परवाने इतरांना चालवण्यास देणाऱ्या व्यवसायिकांची तपासणी मोहीम सोमवार २९/०५/२०२३ पासून ते शनिवार दिनांक ०३/०६/२०२३ पर्यंत राबवणे बाबत आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमे अंतर्गत सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे स्तरावर नेमणुकीस असलेल्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक यांनी त्यांना नेमून देलेल्या कार्य क्षेत्रातील पुनर्वसन झालेल्या व दैनंदिन शुल्क आकारणी झालेल्या सर्व नोंदणीकृत पथ विक्रेत्यांची वरील दिलेल्या कालावधीत प्रभागनिहाय पथके नेमून दररोज तपासणी करावयाची आहे. तपासणीमध्ये ज्या व्यवसायिकांनी परवाने इतरांना चालवण्यास दिलेले आहेत, अशा परवाना धारकांना तपासणी करतेवेळीच online (यापूर्वी नोटीस दिलेली नसल्यास) व सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये लेखी स्वरुपाची नोटीस देऊन संबंधितांची पोच घेऊन संबंधित व्यवसाय धारकासह त्यांचे व्यवसाय साधनाचा फोटो संबंधित निरीक्षकांनी घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे वरील देलेल्या मुदतीत आपल्या हद्दीतील सर्व पुनर्वसन झालेल्या पथ विक्रेत्यांची तपासणी करून केलेल्या कारवाईची अहवाल रोजचेरोज कार्यालयीन whatsapp ग्रुप वर तसेच उप आयुक्त, संबंधित परिमंडळ व मा.उप आयुक्त अतिक्रमण विभाग, मुख्य कार्यालय यांचे मार्फत आमचे कार्यालयाकडे दररोज सादर करण्यात यावा. असे ही आदेशात म्हटले आहे. (Pune PMC News)
—-
News Title | Pune Municipal Corporation | It is not good for the hawkers who pay on the basis of rent! The campaign will be conducted till next Saturday