PMC Pune Employees Promotion | ‘अनुभव’ आणि ‘सेवा’ या शब्दाच्या गल्लतीमुळे पुणे महापालिकेचे बहुसंख्य कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित!
| महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
PMC Pune Employees Promotion | (Author : Ganesh Mule) महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (वर्ग-२) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यापासून प्रलंबित आहे. याबाबत महापालिकेने (PMC Pune) सरकारकडून मार्गदर्शन देखील मागवले होते. सरकारने यात दुरुस्ती सुचवली आहे. हा सगळा गोंधळ अनुभव आणि सेवा या शब्दांमुळे झाला आहे. त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेने सरकारकडे दुरुस्ती प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. मात्र तेच होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित राहावे लागत आहे. (PMC Pune News)
| मानीव दिनांक काय आहे
महापालिकेचा कर्मचारी त्याच्या पदोन्नतीस पात्र असताना देखील काही तांत्रिक कारणामुळे किंवा प्रशासनाच्या चुकीमुळे पदोन्नतीपासून वंचित राहत असतील तर पदोन्नती देण्याबाबत मानीव दिनांक ही संकल्पना सरकारने तयार केली आहे. त्यानुसार महापालिकेने काही लोकांना पदोन्नती देखील दिली आहे. त्यानुसार महापालिकेचे अधिक्षक आणि प्रशासन अधिकारी यांची पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र यात मानीव दिनांकाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने ही पदोन्नती लटकली आहे. कारण सरकारकडून देखील यात एक गोंधळ झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नती देताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. मात्र इतर महापालिकांमध्ये ‘3 वर्षाची नियमित सेवा’ अशी तरतूद आहे.
| महापालिकेने मागवले होते मार्गदर्शन
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील प्रशासकीय सेवा या संवर्गातील ज्या अधिकारी / कर्मचारी यांना निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने ते सध्या त्यांच्या उच्च पदाच्या पदोन्नतीच्या विचाराधीन कक्षेत आले आहेत. त्यांना निम्न संवर्गातील ३ वर्षाचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती द्यावी अगर कसे याबाबत महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते.
या अनुषंगाने सरकारने कळवले होते की, पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नती देताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने उच्च पदाच्या पदोन्नती कक्षेत आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती देण्यासाठी सेवाप्रवेश नियमात सदर अर्हतेमध्ये “निम्न पदावरील ३ वर्षांची
नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे.
नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे.
| महापालिकेने प्रस्ताव पाठवणे आवश्यक
सरकारच्या या मार्गदर्शनानंतर महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र गेल्या दोन तीन महिन्यापासून याबाबत कुठलीही हालचाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक यांची पदोन्नती रखडली आहे. त्यासाठी दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवण्याची मागणी कर्मचाऱ्याकडून होत आहे.
—
Due to the mistake of the words ‘experience’ and ‘service’, most of the employees of Pune Municipal Corporation are deprived of promotion!