PMC Pune Employees-: लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याची पुणे मनपा कर्मचाऱ्यांची खंत
| क्लास वन होण्याची हक्काची संधी जात असल्याने हळहळ
PMC Pune Employees | (Author – Ganesh Mule) | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही हक्काच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) परस्पर सेवा नियमावलीत (service rules) बदल केले जात आहेत. यामुळे या संवर्गातील कर्मचारी हवालदिल झाले असून आमच्यावर अन्याय होत असल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवक (corporators) असते तर ही वेळ आमच्यावर आली नसती, अशाही भावना महापालिका कर्मचारी व्यक्त करत आहेत. (PMC Pune employees)
: प्रशासनाकडून ठेवले जात आहेत प्रस्ताव
महापालिकेच्या सहायक महापालिका (PMC Assistant commissioner) आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार बदल केला जात आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या (Promotion) पद्धतीत बदल केला गेला होता. प्रचलित पद्धतीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार (Seniority) 50% पदोन्नती दिली जात होती. मात्र यात बदल करण्यात आला. त्यानुसार पदवी धारण करणारे अंतर्गत परीक्षेद्वारे वर्ग 1, 2 आणि 3 मधील कर्मचारी देखील सहायक आयुक्त होऊ शकतात. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिकेच्या मुख्य सभेने (pmc pune General body) मान्यता दिली होती व हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. मात्र यात अजून एक बदल केला जाणार आहे. आता फक्त पदवीच (Degree) नाही तर पदविका (Diploma) धारण करणारा कर्मचारी देखील परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. मात्र या माध्यमातून लेखनिकी संवर्गातून (clerical cadre) सहायक आयुक्त (Assistant Municipal commissioner, होण्याची मनीषा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदखल केले असल्याचे दिसून येत आहे. (PMC pune Assistant commissioner)
महापालिका सेवा नियमावली (PMC pune Service rules) नुसार सहायकमहापालिका आयुक्त पदासाठी अर्हता आणि नेमणुकीची पद्धत कशी करावी हे ठरवून दिले आहे. त्यानुसार त्याची साखळी देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये लेखनिकी संवर्गासाठी अधीक्षक, प्रशासन अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अशी आहे. तर तांत्रिक पदासाठी शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि शहर अभियंता अशी आहे. (PMC pune news)
: पदोन्नती मध्ये बदल
त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. मात्र आता यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त पदवीच नाही तर पदविका धारण करणारा कुठल्याही संवर्गातील कर्मचारी परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. प्रशासनाने सेवा नियमावलीत हा बदल केला आहे. त्यामुळे लेखनिकी संवर्गात गेली 20-25 वर्ष काम करणारे, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असणारे कर्मचारी मात्र या नियमामुळे बेदखल होत आहेत. प्रत्येक संवर्गाची एक साखळी ठरलेली आहे. मात्र बदल करताना लेखनिकी संवर्गातील साखळीतच बदल करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)
आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ladder आहे. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, उप आरोग्य अधिकारी आणि आरोग्य अधिकारी अशी ती साखळी आहे. त्याचप्रमाणे वरील उल्लेखानुसार अभियंता पदाची साखळी आहे. समाज विकास विभागात देखील साखळी आहे. त्यानुसार समाजसेवक, सहायक समाज विकास अधिकारी, उपसमाज विकास अधिकारी आणि मुख्य समाज विकास अधिकारी अशी साखळी आहे. उद्यान विभागाची देखील साखळी आहे. तसेच लेखा व वित्त विभागाची देखील साखळी आहे. मात्र बदल करताना फक्त लेखनिकी संवर्ग : प्रशासकीय सेवा याच्या 50% पदोन्नतीत बदल केला जात आहे. या संवर्गात कुठल्याही साखळीतील कर्मचारी येऊन सहायक आयुक्त होऊ शकतो. मात्र लेखनिकी संवर्गातील कर्मचारी दुसरीकडे जाऊ शकत नाही. (Pmc Pune Marathi News)
– प्रशासनाचे विषयपत्र विसंगत
प्रशासनाने पदोन्नतीत बदल करण्याचे विषयपत्र ठेवले आहे. या आधी देखील ठेवले होते. मात्र त्यात विसंगती दिसून येते. विषयपत्रात म्हटले आहे कि तांत्रिक पदांना अतांत्रिक संवर्गात पदोन्नती देता येणार नाही. एकीकडे असे म्हणायचे आणि दुसरीकडे कुठल्याही संवर्गातील कर्मचारी हा परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकतो, असे म्हणायचे. यात विसंगती दिसून येते. हा लेखनिकी संवर्गावर अन्याय असल्याचे सांगितले जात आहे.
कारण बऱ्याच कर्मचाऱ्यांची सेवा 15- 20 वर्षाहून अधिक काळ झाली आहे. त्यांनी कर संकलन, सामान्य प्रशासन पासून बऱ्याच खात्यात काम केले आहे. सेवा ज्येष्ठेतेनुसार त्यांना सहायक आयुक्त पद मिळायला हवे आहे. मात्र अशा कर्मचाऱ्यांचे क्लास वन होण्याचे मार्ग बंद झाले आहेत. एवढे काम करून पुन्हा त्याला परीक्षा देण्यासाठी मजबूर करणे, हे नियमबाह्य असल्याचे बोलले जात आहे. मुळात सहायक आयुक्त होणार अधिकारी हा खूप अनुभवी असणे, आवश्यक आहे. फक्त 5 वर्ष सेवा झालेला माणूस त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे पदोन्नती पूर्वीसारखीच ठेवण्याची मागणी केली जात आहे. बदल करायचा असेल तर प्रतिनियुक्तीत करा, अशीही मागणी होत आहे.
——
PMC Pune Employees-: Pune municipal Corporation (PMC) employees regret that injustice is being done to the clerical cadre