Pune Municipal corporation Health Schemes | डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक 

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal corporation Health Schemes | डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक 

Ganesh Kumar Mule May 02, 2023 2:21 PM

Contract Employees | ऐन दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांचा असंतोष सहन करावा लागेल | राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा
CFC | Property Tax | मिळकत करावरील शास्ती टाळा | सुट्टीच्या दिवशी ही टॅक्स भरणा करण्यासाठी CFC राहणार सुरु 
Pune News | महिलांवरील अत्याचारांचे विरोधात महाविकास आघाडी आक्रमक |  सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन

Pune Municipal corporation Health Schemes | डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन संघटना आक्रमक

Pune Municipal corporation Health Schemes | पुणे महानगरपालिकेद्वारा (Pune Municipal Corporation) डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना (Dr. Shamaprasad Mukherjee Health Scheme) पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती . मागील वर्षभरात तब्बल 47 हजार हुन अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु निधी नसल्याचा कारण देत या अर्थसंकल्पात निधी न देता हि आरोग्यविषयक योजना बंद करून पुणेकर नागरिकांच्या आरोग्य वेठीस धरण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरु आहे. याबाबत पतित पावन संघटना (Patit Pawan Sanghatana) आक्रमक झाली आहे. योजना सुरु करण्याची मागणी संघटनेने महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Pune Commissioner Vikram Kumar) यांना केली आहे.

याबाबत संघटनेकडून आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार कोरोना रुपी समस्येच घोंघावणारा वादळ आता कुठे कमी झालं असताना . संपूर्ण जगाला आरोग्यविषयक यंत्रणा सक्षम करण्याचा एवढा मोठा धडा दिलेला असताना देखील पुणेकरांच्या आरोग्याशी निगडित योजनेचा प्रशासकीय बळी दिला जातो हि शरमेची बाब आहे .
स्मार्ट सिटी आणि G20 साठी सर्वसामान्य पुणेकरांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करणाऱ्या पालिकेला एक अत्यंत उपयुक्त आणि आरोग्याशी निगडित योजना निधी अभावी बंद पडताना लाज कशी वाटत नाही . या योजनेचा बळी देताना आयुक्तांना जनाची नाहीतर मनाची लाज आहे का ?
पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना आठवड्याभरात कार्यान्वित नाही झाली तर पालिका आयुक्तांना पतित पावन पुण्यात फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा आज पालिका आयुक्तांना देण्यात आला. यावेळी पतित पावन संघटना जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, कामगार महसंगाचे रवींद्र भांडवलकर,प्रसाद वाईकर,योगेश वाडेकर, यादव पुजारी,विजय क्षीरसागर, सौरभ पवार आदी पढदिकारी उपस्थित होते. (PMC Pune Health Schemes News)