PMC Pune Employees | BLO म्हणून कामकाज करण्यास महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | जिल्हा प्रशासनाकडून तक्रार 

HomeपुणेBreaking News

PMC Pune Employees | BLO म्हणून कामकाज करण्यास महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | जिल्हा प्रशासनाकडून तक्रार 

Ganesh Kumar Mule Apr 27, 2023 11:16 AM

Amendment in service Rules | PMC Pune | पुणे महापालिका सेवा प्रवेश  नियमावलीत करणार सुधारणा  | 20 डिसेंबर पर्यंत माहिती सादर करण्याचे सर्व विभागांना अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 
7th Pay Commission | सातवा वेतन आयोग फरक रक्कम | सेवानिवृत्त सेवकांची बिले तात्काळ तपासून घ्या  | अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश | आगामी 4 दिवसात मिळणार फरकाची रक्कम 
Finance Committee | PMC Pune | ६ महिने उलटूनही वित्तीय समितीने मान्य केलेल्या कामांचे कार्यादेश नाहीत | महापालिका आयुक्त करणार शिस्तभंगाची कारवाई

BLO म्हणून कामकाज करण्यास महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

| जिल्हा प्रशासनाकडून तक्रार

पुणे | पुणे शहरातील विधानसभा मतदार संघांमध्ये (Pune Constituency) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडून (District Administration Authority)  करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात कामात टाळाटाळ केल्याचे सिद्ध झाले तर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी दिला आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार पुणे शहरातील विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कामकाज करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडील सेवकांच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे व मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी संबंधित विधानसभा मतदार संघ यांचेकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही सेवक निवडणूकविषयक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे  पत्रान्वये  महापालिका आयुक्त यांना कळविण्यात आले आहे. (pune municipal corporation Employees)

त्यानुसार बरेच कर्मचारी  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे कामकाज करत नसल्याचे दिसून आले आहे. सदर सेवकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कामकाज हे आपल्या पदाचे कामकाजास सांभाळून करावयाचे आहे. तसेच सोबत जोडलेल्या यादीतील
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी कामकाजामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळा केल्याचे सिद्ध झाल्यास “लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील परि. २९ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील परि. १३४” अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.  (PMC Additional Commissioner Ravindra Binwade)

| कामकाज टाळणाऱ्या सेवकांची यादी