PMC Recruitment | पुणे महापालिका पद भरती |  अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ   | उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज

HomeपुणेBreaking News

PMC Recruitment | पुणे महापालिका पद भरती | अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ | उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज

Ganesh Kumar Mule Mar 27, 2023 2:53 PM

Uruli Devachi and Fursungi | कचरा डेपोची जागा मनपा हद्दीत ठेऊन उरुळी व फुरसुंगी गावे वगळली जाणार! | मुख्य सभेसमोर प्रस्ताव 
Pandharpur Aashadhi wari palkhi sohala | सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये
12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

पुणे महापालिका पद भरती |  अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ

| उमेदवार 13 एप्रिल पर्यंत करू शकतात अर्ज

| पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरतीकरण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना 28 मार्च पर्यंत अर्ज करण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. दरम्यान या प्रक्रियेला खूप अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कारण एवढ्या कालावधीत महापालिकेकडे फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज आले. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. त्यामुळे अर्ज वाढण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवार 13 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकतात. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
याअगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे.  पुणे महानगरपालिका पद भरतीची जाहिरात  6/3/2023 अन्वये देण्यात आली असून उमेदवारांना अर्ज सादर करणेकरिता 28/3/2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि सदर जाहिरातीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर करणेकरिता 13/4/2023 अखेर मुदतवाढ देण्यात येत आहे. शासनाचे प्रचलित आदेश, वेळोवेळी केलेल्या सुधारणा या पद भरतीस नियमाप्रमाणे लागु राहतील. असे महापालिकेने म्हटले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 13/04/2023 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी
https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर  online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या
लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.