Tata Group Vs PMC | टाटाच्या उज्वल कंपनीसोबत घेतलेला पंगा महापालिकेच्या अंगाशी!   | बिल अडवून ठेवल्याने महापालिकेचेच नुकसान

HomeपुणेBreaking News

Tata Group Vs PMC | टाटाच्या उज्वल कंपनीसोबत घेतलेला पंगा महापालिकेच्या अंगाशी! | बिल अडवून ठेवल्याने महापालिकेचेच नुकसान

Ganesh Kumar Mule Mar 20, 2023 5:13 PM

Republic Day 2025 Pune | भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन
4th Annual Blood Donation Camp by MNGL
Cyber Fraud Tips |  हा चार अंकी क्रमांक तुमच्याकडे असू द्या | जर तुम्ही ऑनलाइन फसवणूकीला बळी पडला असाल तर उपयोगी पडेल 

टाटाच्या उज्वल कंपनीसोबत घेतलेला पंगा महापालिकेच्या अंगाशी! 

| बिल अडवून ठेवल्याने महापालिकेचेच नुकसान 

 
पुणे | शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामावर महापालिका असमानाधी आहे. त्यामुळे जवळपास १५ कोटी महापालिका कंपनी कडून वसूल करणार आहे. मात्र कंपनीसोबत घेतलेला पंगा महापालिकेलाच महागात पडला आहे. कंपनीने बिल वेळेवर मिळत नसल्याबाबत पुणे महापालिकेची राज्य सरकारकडे तक्रार केली होती. तसेच याविरोधात औदयोगिक न्यायालयात देखील दाद मागितली होती. उज्वल  कंपनीला सात टक्के व्याजासह २ कोटी ८१ लाख १९ हजार रूपये देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.
पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनी कडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशात आले आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापारीक्षकानी जोरदार आक्षेप काढले आहेत. तसेच कंपनी कडून त्याबदल्यात १५ कोटी वसूल करण्याचे आदेश देखील मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले होते. त्यानंतर विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला होता. मात्र हे प्रकरण महापालिकेच्याच अंगाशी आले आहे. आता अडवलेले बिल व्याजासहित द्यावे लागणार आहे.