PMC property: भवानी पेठेतील दोन मिळकती वगळून 129 मिळकतीचे करारनामे होणार नियमित

HomeपुणेPMC

PMC property: भवानी पेठेतील दोन मिळकती वगळून 129 मिळकतीचे करारनामे होणार नियमित

Ganesh Kumar Mule Sep 21, 2021 7:03 AM

Nagar Road BRTS | पुणे महापालिकेकडून नगर रोड बीआरटी मार्ग हटवण्याचे काम सुरू | पावणे तीन वर्षांपासून मार्ग होता बंद
PMC Pune | पुणे महापालिका वर्धापनदिन विशेष | पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी!
PMC  Pension | पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना दिलासा ! |  जानेवारीत 104  पेन्शन प्रकरणे मार्गी

समाज विकास विभागाच्या 129 मिळकतीचे करारनामे नियमित करणार

: स्थायी समितीची मान्यता

:भवानी पेठेतील 2 मिळकती वगळल्या

पुणे: महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत समाज विकास केंद्र, बालवाडी, अभ्यासिका, व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन, बालभवन आदी वास्तू विविध संस्थांना चालविण्यास दिलेल्या 129 वास्तूंचे सन २००८ च्या मिळकत किंवा जागा वाटप नियमावलीनुसार करारनामे नियमित करण्यास करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. प्रस्तावात 131 ठिकाणे नमूद केली होती. मात्र भवानी पेठेतील दोन ठिकाणे वगळण्यात आली. त्याबाबतची उपसूचना नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिली होती.

: करारनामे स्पष्ट नाहीत

रासने म्हणाले, ‘समाज विकास विभागाच्या १३१ मिळकती विविध संस्थांच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी अंगणवाडी, अभ्यासिका, ग्रंथालय, महिला स्वयंरोजगार, ज्येष्ठ नागरिक संघ. विरंगुळा केंद्र असा वापर केला जातो. या संस्थांबरोबर महापालिकेने २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार केलेले आहेत. परंतु त्यावर करार संपुष्टात येणारा कालावधी नमूद केलेला नाही. तसेच काही करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यात आलेली नाही किंवा परिपूर्ण नाहीत.’
रासने पुढे म्हणाले, ‘मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून वास्तूंचे आवश्यकतेनुसार मूल्यांकन करणे, थकित भाडे आकारणी करणे, महापालिकेच्या संयुक्त प्रकल्पांसाठी ३० वर्षे भाडेकराराची मुदत देणे, व्यावसायिक किंवा अन्य वापरांसाठी वास्तूंचा उपयोग होत असेल, करारनाम्यातील अटींचा भंग होत असेल तर सदर वास्तू परत ताब्यात घेणे, नोंदणीकृत संस्थांकडून संचालनासाठी अर्ज मागविणे, देखभाल दुरुस्तीसाठी आयुक्तांच्या पूर्वपरवानगीने माफक शुल्क आकारणे अशा विविध कारणांसाठी या १३१ संस्थांबरोबरचे करारनामे नियमित करणे आवश्यक आहे. मात्र यातील दोन ठिकाणे वगळण्याची उपसूचना देण्यात आली होती. त्याबाबतच्या कार्यवाहीसाठी समाज विकास विभागाला परवानगी देण्यात आली आहे.’

: नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिली उपसूचना

सदर प्रस्तावापासून प्रभाग क्रमांक 19 या  भागातील समाज विकास केंद्र, वैशाली सायकल मार्टजवळ, ५७६, काशेवाडी व समाजमंदिर/व्यायामशाळा फायनल प्लॉट नं.३४४/२, कै.अरुणकुमार वैद्य स्टेडियम आवार, पुणे हे वगळण्यात यावे. सदर व्यायामशाळा बाबत मा.क्रीडा समिती, मा.स्थायी समितीने सील करून ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मान्य केलेला आहे व माहे जुलै २०२१ च्या कार्यपत्रीकेवर मा.मुख्य सभेच्या मान्यतेस आहे. तसेच वैशाली सायकल मार्ट, ५७६, काशेवाडी जागेचा करारनामा बद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे हे दोन्ही वगळून प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0