HomeBreaking NewsPolitical

State vs Somayya : भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

Ganesh Kumar Mule Sep 19, 2021 12:58 PM

Mohan Bhagwat | सेवा हा माणुसकीचा धर्म | डॉ. मोहन भागवत
PMC Assistant Commissioner Dr. Jyoti Dhotre | पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ ज्योती धोत्रे यांचे निधन! 
PMRDA News | बांधकामांसह गृहप्रकल्पांना मिळणार दिलासा | पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतला सकारात्मक निर्णय

किरीट सोमय्या काय आतंकवादी आहेत का?

: भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सरकारला सवाल

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात जाऊन विविध नेत्यांची भांडाफोड करणार आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी कोल्हापूर चे जिल्हाधिकारी यांनी सोमय्या यांना कोल्हापुरात न येण्याबाबत नोटीस पाठवली आहे. त्याबाबत भाजप कडून निषेध होतो आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरकारला काही सवाल केले आहेत.
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीटजी सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर १०० पोलिसांनी वेढा दिला आहे.या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरत आहेत, परंतु सत्ताबळ वापरून या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का ?

चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष