Pune News | शहराच्या काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार 

HomeपुणेBreaking News

Pune News | शहराच्या काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार 

Ganesh Kumar Mule Feb 03, 2023 12:18 PM

Old Pension Scheme | जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक | विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार
Property tax | मिळकतकराच्या बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून | प्रथम सहामाहीच्या शास्तीचा कालावधी 1 महिना वाढणार
MLA Sunil Kamble | पुणे कॅंटॉन्मेंट मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन 

शहराच्या काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

मंगळवार ७ फेब्रुवारी  रोजी वानवडी शिंदे छत्री जवळील पुलावरील जल वितरण नलिकाची अत्यावशक दुरुस्ती करिता लष्कर पंपींगचे अखत्यारीतील हयसर्व्हिस व २८५ ESR टाकी वरील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा मंगळवार रोजी बंद राहणार आहे. तसेच बुधवार  रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
लष्कर जलकेंद्र भाग :- संपूर्ण कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, कमांड हॉस्पिटल एरिया, लष्कर भाग, प्रभाग क्र. २५ मधील वानवडी गावठाण, एस. आर. पी. एफ वानवडी, एस. व्ही. नगर, काळूबाई मंदिर परिसर सोलापूर रोड, सोपानबाग, उदयबाग, डोबरवाडी व प्रभाग क्र. २१ मधील बी. टी. कवडे रोड, भीमनगर, भारत फोर्ज कंपनी परिसर, व संपूर्ण घोरपडी परिसर इ.