Budget Provision | यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

HomeपुणेBreaking News

Budget Provision | यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

Ganesh Kumar Mule Jan 28, 2023 5:37 AM

PMC Commissioner | 24 मार्च पर्यंत बिले सादर करता येणार | महापालिका आयुक्तांकडून 9 दिवसाची मुभा
GST | PMC | GST लागू नसलेल्या कामाचीही GST लावून बिले काढण्याचे प्रकार  | लेखापरीक्षणात आढळून आली बाब 
Bills : Road Department : V G Kulkarni : 15 मार्च नंतर पथ विभाग बिले स्वीकारणार नाही 

यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

| मागील वर्षी आदेश न पाळल्याने आयुक्तांचे पुन्हा आदेश
पुणे | महापालिका प्रशासनाकडून विविध खात्यांना विकासकामासाठी बजेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र सर्वच विभागाकडून आर्थिक वर्षाच्या शेवटी बिले सादर केली जातात. त्यामुळे मागील वर्षी आदेश देण्यात आले होते कि, तिमाही खर्चाचे अहवाल द्यावेत. मात्र त्यावर अमल झाला नाही. त्यामुळे यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा, असे आदेश महापालिका आयुक्तांना जारी करावे लागले आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या विविध विभागांस विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतुदी उपलब्ध करून दिल्या जातात. सदर तरतुदिमधून निविदा प्रक्रिया राबवून वर्षाचे कालावधीत समप्रमाणात खर्च करणे अपेक्षित असताना खात्यांकडून तसे न करता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यासाठी सादर केली जातात. त्यामुळे शेवटच्या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च (Rush of Expenditure) झालेला दिसतो. सदर बाब वित्तीय नियमांशी विसंगत असून प्रशासकीय दृष्ट्याही उचित नाही. यास्तव सर्व खात्यांनी प्रतीमहा होणारा खर्च (Cash Flow Statement ) व प्रति तिमाही झालेल्या कामांची बिले व जमा खर्चाबाबतचा तपशील तिमाही अहवाल सादर करणेबाबत  १९/४/२०२२ चे कार्यालय परीपत्रकान्वये निर्देश देण्यात आले आहेत. तथापि त्यानुसार कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

तरी वरील बाब विचारात घेऊन सर्व खातेप्रमुख यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या कामांची देयके दिनांक १५ मार्च २०२३ पर्यंत मुख्य लेखा व वित्त विभागाकडे देयके अदा करण्यासाठी सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच डिसेंबर २०२२ अखेर काम पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यासाठी दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत  सादर करण्यात यावी. बिलासोबत सादर करावयाच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण असे देयक सादर करण्यात यावे. अपूर्ण कागदपत्रांसह देयक सादर केल्यास व त्यामुळे देयक अदा करण्यास विलंब झाल्यास / तरतूद व्यपगत झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व व जबाबदारी संबंधित खात्याची / विभागाची राहील. सर्व खातेप्रमुख यांनी आपले विभागातील सर्व संबंधितांना याबाबत सूचना देऊन वर विहित केलेल्या वेळेत देयके मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठविण्याची दक्षता घ्यावी.