water closure in Warje area | वारजे परिसरात पुन्हा पाणी बंद!

HomeपुणेBreaking News

water closure in Warje area | वारजे परिसरात पुन्हा पाणी बंद!

Ganesh Kumar Mule Dec 26, 2022 2:33 PM

World Food Safety Day | जागतिक अन्न सुरक्षा दिन | “सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य”
Pune Bal Pustak Jatra | पुणे बाल पुस्तक जत्रेचा रविवारी समारोप; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राहणार उपस्थित
By-election | Chinchwad | चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

वारजे परिसरात पुन्हा पाणी बंद (water closure)!

येत्या गुरुवारी  वारजे जलकेंद्राचे अखत्यारीतील गांधी भवन टाकी वरील कोथरूड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकी वरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी  सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal corporation)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-
१) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर :- महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, प्रमतेश सोसायटी, डी.पी. रोड वरील भाग,
२) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसर :- बावधन, गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसा., विद्यान नगर, पाषाण रोड वरील डावा, उजवा
भाग.  (Water closure in Warje area)