माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानिमित्त महापालिकेची कार्यालये ठेवण्यात आली बंद
पुण्याच्या माजी महापौर (Former Mayor Mukta tilak) आणि भाजपच्या कसबा विधान सभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास निधन झाले. माजी महापौर म्हणून दुखवटा व्यक्त करण्यासाठी पुणे महापालिकेची कार्यालये नियमित वेळेपेक्षा १ तास अगोदर बंद ठेवण्यात आली. याबाबत महापालिकेकडून आदेश जारी करण्यात आले. (PMC Pune)
आदेशानुसार पुणे शहराचे माजी महापौर कै. मुक्ता शैलेश टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. त्यांच्या दुःखद निधना निमित्त दुखवटा व्यक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेची सर्व शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) मान्य धोरणानुसार आज २२/१२/२०२२ रोजी दुपारनंतर एक तास अगोदर (दु.५.१५ ते ६.१५) बंद ठेवण्यात आली. याबाबतचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी जारी केले. (Pune Municipal corporation)