रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ची गुडलक चौकात निदर्शने
योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात “बाबा रामदेव – बाबा कामदेव” ,”बाबा रामदेव चा धिक्कार असो” , महिलांच्या सन्मानात……राष्ट्रवादी मैदानात” या घोषणा महिला भगिनींच्या वतीने करण्यात आल्या.
यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रीचे आदिशक्ती आणि देवी म्हणून पूजन करतो. स्त्री शक्तीचा जागर व सन्मान हा फक्त नवरात्री पुरता किंवा महिला दिनापुरता मर्यादित विषय नसून ३६५ दिवस स्त्रियांचा सन्मान राखणे त्यांना पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक देणे, हीच यापूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली शिकवण आहे. परंतु दुर्दैव असे की महाराष्ट्रात बाबा रामदेव सारखा भोंदू बाबा या महाराष्ट्राच्या पुण्यभूमी मध्ये महिलांबाबत अत्यंत खालच्या पातळीचे विधान करतात.
ठाण्यामध्ये रामदेव बाबा यांनी तमाम माता-भगिनींच्या पोशाखाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले ते अत्यंत निंदनीय होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा जाहीर निषेध करतेहे त्यांच्या मानसिक विकृतीचे प्रदर्शन घडवणारे वक्तव्य होते. याच्यापेक्षा सर्वात धक्कादायक बाब आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे , असे म्हणत अमृता फडणवीस त्यांच्या बाजूला बसलेल्या असताना तसेच अनेक माता भगिनी समोर बसलेल्या असताना काल त्यांनी निंदनीय वक्तव्य केले, असे होत देखील असताना अमृता फडणवीस शेजारी बसून हसत होत्या, यावरून त्यांची मानसिकता दिसून येते.
मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर बाबा रामदेव यांच्या वक्तव्याशी सहमत नसतील तर त्यांनी बाबा रामदेव यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
या आंदोलप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते प्रदीप देशमुख,अर्चना कांबळे मुणालीनी वाणी,किशोर कांबळे , संतोष नांगरे , वैष्णवी सातव स्वाती चिटणीस, विनोद पवार प्राजक्ता जाधव विपुल मैसूरकर , सुशांत ढमढेरे , अर्जुन गांजे, शिवाजी पाडाळे ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.