Phoenix Social Foundation | अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा | फिनिक्स सोशल फाउंडेशनचा उपक्रम

Homeपुणेsocial

Phoenix Social Foundation | अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा | फिनिक्स सोशल फाउंडेशनचा उपक्रम

Ganesh Kumar Mule Nov 15, 2022 12:47 PM

Pune Congress Agitation | भाजप प्रेरित मनुस्मृतीचे राज्य कधीही काँग्रेस येऊ देणार नाही – अरविंद शिंदे
Merged 32 Villages Property Tax | समाविष्ट गावांच्या मिळकत कर आकारणी बाबत निर्णय ठरला! | आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ३२ गावांची बैठक
Maharashtra Cabinet Meeting Decisions | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या

अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा | फिनिक्स सोशल फाउंडेशनचा उपक्रम

१४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. याचे निमित्त साधून फिनिक्स सोशल फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल तांबेकर यांचा वाढदिवस विकास अनाथ आश्रम रामदास नगर चिखली येथे साजरा करण्यात आला.

या आश्रमात ४० अनाथ मुले आहेत. या मुलांना एक वेळेचे जेवण आणि बिस्किट्स देण्यात आले. तसेच भविष्यामध्ये आरोग्य संदर्भात कुठलीही समस्या आल्यास फिनिक्स सोशल फाउंडेशन तत्पर राहील, अशी ग्वाही फिनिक्स सोशल फाउंडेशन चे अधक्ष्य डॉक्टर अनिल तांबेकर यांनी दिली.

यावेळी उपाधक्ष्या आरती तांबेकर, सचिव रमाकांत दबडे, सदस्य सुनील गुडदे, शेखर पवार, शंकर ढास, सागर भोरे, पलक ढोकळे आदि उपस्थित होते.