वैद्यकीय योजनांसाठी 9 कोटींची औषध खरेदी
: स्थायी समितीने दिली मान्यता
पुणे : महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरी गरीब वैद्यकीय योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून औषध खरेदी केली जाते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने दोन्ही योजनांसाठी 9 कोटी रुपयांची औषध करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला नुकतीच समितीने मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील पिवळे रेशन कार्ड असलेल्या लोकांसाठी शहरी गरीब वैद्यकीय योजना चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून लोकांना उपचार आणि औषधे दिली जातात. त्याच पद्धतीने महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकासाठी अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. शहरी गरीब योजनेसाठी 4 कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याचा तर अंशदायी योजनेसाठी 5 कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याचा असा 9 कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला होता. समितीने त्याला नुकतीच मान्यता दिली आहे.
COMMENTS